सानपाड्यामध्ये डेंग्यूमुळे महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: July 6, 2017 06:42 IST2017-07-06T06:42:58+5:302017-07-06T06:42:58+5:30

पावसाळा सुरू झाल्यापासून डेंग्यू व मलेरियाच्या रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. सानपाडा सेक्टर ७ मधील नेहा नंदकुमार वेदपाठक

Female death due to dengue in sunpad | सानपाड्यामध्ये डेंग्यूमुळे महिलेचा मृत्यू

सानपाड्यामध्ये डेंग्यूमुळे महिलेचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून डेंग्यू व मलेरियाच्या रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. सानपाडा सेक्टर ७ मधील नेहा नंदकुमार वेदपाठक या महिलेचा बुधवारी डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईमध्ये साथीचे आजार वाढू लागले आहेत. पाऊस सुरू झाल्यापासून डासांचा उपद्रव वाढला आहे. डेंग्यू व मलेरियाचे रूग्ण वाढले आहेत. सानपाडा येथील गायत्री सोसायटीमध्ये राहणाऱ्या नेहा वेदपाठक यांना चार दिवसांपूर्वी ताप आला होता.
उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली व उपचार घेत असतानाच बुधवारी दुपारी त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालिका प्रशासनाने शहरात धूर फवारणीचे प्रमाण वाढवावे, साथीच्या आजाराविषयी जनजागृती करण्यात यावी. डेंग्यू व मलेरियापासून कसा बचाव करता येईल.
ताप आल्यास रूग्णांनी काय काळजी घ्यावी याविषयी माहिती दिली जावी, अशी मागणी शिवसेना पदाधिकारी रामचंद्र पाटील व नगरसेविका ऋचा पाटील यांनी केली आहे.

Web Title: Female death due to dengue in sunpad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.