शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार प्रकरण : ‘त्या’ अपघातामुळे फसला हत्येचा कट, नातेवाइकांना संपवण्याची केली होती तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 09:36 IST

रुपेशचे वडील अरुण यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांची वाशीतील एका बारमध्ये भागीदारी होती. परंतु काही नातेवाइकांनी फसविल्यामुळे भागीदारी गमवावी लागून, वाईट दिवस आल्याचे वाटत होते.

सूर्यकांत वाघमारे - नवी मुंबई : पिस्तूल बनावट म्हटल्याने जमिनीवर गोळी झाडणाऱ्या तरुणाला कोपरखैरणे पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. घटनेच्या वेळी तो काही नातेवाइकांच्याच हत्येच्या तयारीत होता. तत्पूर्वीच झालेल्या अपघातामध्ये त्याचा राग अनावर झाल्याने त्याच ठिकाणी जमिनीवर गोळीबार करून त्याने पळ काढला . रुपेश कुरकेरा (३५) असे त्याचे नाव असून, तो कोपरखैरणे सेक्टर २ येथे राहणारा आहे. घटनेच्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत पिस्तूल घेऊन एका नातेवाइकाच्या हत्येच्या उद्देशाने चालला होता, अशी माहिती पुढे आली आहे. तत्पूर्वी त्याचा किरकोळ अपघात झाल्याने वादावादीत त्याचा संताप अनावर झाल्याने घटनास्थळीच त्याने जमिनीवर गोळी झाडली होती. त्यामुळे हा अपघात घडला नसता तर हत्येचा रचलेला कट यशस्वी झाला असता. रुपेशचे वडील अरुण यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांची वाशीतील एका बारमध्ये भागीदारी होती. परंतु काही नातेवाइकांनी फसविल्यामुळे भागीदारी गमवावी लागून, वाईट दिवस आल्याचे वाटत होते. यामुळे वडिलांना फसविणाऱ्या नातेवाइकाचा काटा काढण्याच्या उद्देशाने तो उत्तर प्रदेशमधून पिस्तूल घेऊन आला होता. त्यानुसार घटनेच्या दिवशी तो वडिलांची भागीदारी होती त्या हॉटेलमध्ये दारू पिऊन कोपरखैरणेत नातेवाइकांच्या घराच्या दिशेने जात असतानाच त्याचा अपघात झाला. त्याने चार वर्षांपूर्वी दारूच्या नशेत हवेत गोळीबार केला होता. या प्रकरणी त्याला अटक झाली होती.

गुरुवारी केली अटककोपरखैरणे येथे जमिनीवर गोळी झाडून एकाने पळ काढल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कोपरखैरणे पोलिसांनी गोळीबार करणाऱ्याच्या शोधासाठी पथके तयार केली होती. अखेर गुरुवारी रात्री त्याला अटक करण्यात आली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबईFiringगोळीबारPoliceपोलिस