सेंट जोसेफ शाळेविरोधात पालकांचे आजपासून उपोषण
By Admin | Updated: February 16, 2017 02:17 IST2017-02-16T02:17:01+5:302017-02-16T02:17:01+5:30
नवीन पनवेल सेक्टर ७ येथील सेंट जोसेफ शाळेविरोधात पालक पुन्हा बेमुदत आमरण उपोषण करणार आहेत. गुरुवारी १६ फेब्रुवारीपासून

सेंट जोसेफ शाळेविरोधात पालकांचे आजपासून उपोषण
पनवेल : नवीन पनवेल सेक्टर ७ येथील सेंट जोसेफ शाळेविरोधात पालक पुन्हा बेमुदत आमरण उपोषण करणार आहेत. गुरुवारी १६ फेब्रुवारीपासून शाळेच्यासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती पालकांनी दिली.
सेंट जोसेफ शाळेच्या मनमानी कारभाराबद्दल पालकांनी वेळोवेळी शासन दरबारी व शासकीय अधिकाऱ्यांना विनंती अर्ज केलेले आहेत. मात्र, शाळा प्रशासनाने कोणत्याही कायद्याचे व नियमांचे पालन केलेले नसल्याचा आरोप पालक करत आहेत. म्हणून त्रस्त होऊन पालकांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी दिलेली आश्वासने पाळली नसल्याने दुसऱ्यांदा आंदोलन करावे लागत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)