शेतकऱ्यांना मिळाली २६ लाख रुपये थकबाकी, चार वर्षांचा प्रश्न मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 00:32 IST2021-02-20T00:31:38+5:302021-02-20T00:32:03+5:30
Farmers get arrears of Rs 26 lakh : बाजार समितीवर नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना मिळाली २६ लाख रुपये थकबाकी, चार वर्षांचा प्रश्न मिटला
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन व संचालक मंडळाने शेतकऱ्यांची थकीत रक्कम परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कांदा मार्केटमध्ये २०१७ पासून चार शेतकऱ्यांचे २६ लाख रुपये थकविले हाेते. सभापती अशोक डक व संचालक मंडळाने पाठपुरावा करून शेतकऱ्यांना पैसे मिळवून दिले आहेत.
बाजार समितीवर नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. अनेकाचे पैसे व्यापाऱ्यांनी थकविल्याच्या तक्रारी प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तक्रारींचा निपटारा करण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी सखाराम शिंदे, अविनाश डाेके, मंगेश मीना व अरीफ फकीरा यांनी २०१७ मध्ये गाळा नंबर एफ १५२ मधील व्यापाऱ्याकडे पाठविला होता. पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांचे २६ लाख ७ हजार ६६५ रुपये परत केले जात नव्हते. सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर, संचालक अशोक वाळुंज व प्रशासनाने हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. बँकेकडे पाठपुरावा करून गाळ्याचा लिलाव करत शेतकऱ्यांना पैसे दिले.