शेतकरी कर्जमाफीचा निर्णय लवकरच - चंद्रकांत पाटील
By Admin | Updated: April 19, 2017 14:07 IST2017-04-19T14:07:07+5:302017-04-19T14:07:07+5:30
सरकार शेतक-यांना कर्जमाफीसाठी बांधिल आहे आणि लवकरच कर्जमाफी जाहीर करण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय लवकरच - चंद्रकांत पाटील
>ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 19 - सरकार शेतक-यांना कर्जमाफीसाठी बांधिल आहे आणि लवकरच कर्जमाफी जाहीर करण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. मात्र, त्यापूर्वी शेतक-यांना सक्षम करणेदेखील महत्वाचे आहे, त्यासाठीही सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. शेतक-यांनी कर्जाची सवय लागली आहे. काहीजण कर्जफेडू शकतात, तर काहींना शक्य नसते. त्यामुळे जे शेतकरी कर्ज फेडू शकत नाही त्यांना प्रामुख्याने कर्जमुक्ती मिळावी हे वैयक्तित मत आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
एपीएमसी येथे माथाडी भवनच्या सभागृह उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या भाजपाप्रवेशबाबत असलेला संभ्रम त्यांनी अधिक वाढवला. भाजपातर्फे लवकरच नरेंद्र पाटील यांना चांगला सन्मान मिळणार आहे, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यामुळे संभ्रम अधिक वाढला आहे. तर नारायण राणे यांच्या भाजपाप्रवेश बाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे, असेही ते म्हणाले.