शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी नेते तुपकरांना खालापूरमध्ये रोखले; आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न, रविकांत तुपकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 10:02 IST

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पुणे येथे ३ मार्च रोजी झालेल्या बैठकीत तुपकर यांनी शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करा या मागणीसह अन्य मागण्या केल्या होत्या.

राकेश खराडे 

मोहोपाडा : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यातून काढण्यात आलेला मोर्चा बुधवारी सकाळी खालापूर पोलिसांनी अडविला. त्यानंतर तुपकरांसह १३ ते १४ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन दाेन तास रोखून ठेवले होते. गनिमी काव्याने ते मुंबईत दाखल होणार होते.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पुणे येथे ३ मार्च रोजी झालेल्या बैठकीत तुपकर यांनी शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करा या मागणीसह अन्य मागण्या केल्या होत्या. त्यामुळे आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले होते. बुलढाणा जिल्ह्यातून सुमारे २५० वाहनांतून शेकडो शेतकरी मुंबईला जाणार होते. त्यांना खालापूर तालुक्यातील नढाळ येथे पोलिसांनी रोखले.  आम्ही शांतता व सनदशीर मार्गाने आंदोलन करणारच म्हणत हे कार्यकर्ते गनिमी पद्धतीने मुंबईत दाखल होणार होते. त्यामुळे पोलिसांनी तुपकर यांच्यासह कार्यकर्त्यांना नढाळ येथील मंदिरात रोखून धरले होते.  

आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न : रविकांत तुपकर प्रचंड पोलिस बंदोबस्ताद्वारे आमचे आंदोलन चिरडण्याचा सरकार प्रयत्न करत असेल तर आम्ही सरकारला सांगू आम्हाला गोळ्या घाला, आम्हाला मारून टाका. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत. अरबी समुद्रात  कर्जांचे सातबारा सोडून आम्ही कर्जमुक्त झालो, अशी घोषणा करण्याची आमची भूमिका आहे, असे  रविकांत तुपकर यांनी खालापूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरी