शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

'तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता', 'माझ्या नवऱ्यानं सोडलिया दारू' या गाण्यांचे गीतकार हरेंद्र जाधव यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 12:41 PM

lyricist harendra jadhav passes away : हरेंद्र जाधव यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1933 रोजी नाशिकच्या निफाड तालुक्यातील मिग ओझर येथे झाला होता.

ठळक मुद्देगेल्या काही वर्षांपासून हरेंद्र जाधव हे पक्षाघाताने आजारी होते. त्यामुळे ते अंथरुणावरच होते.

नवी मुंबई : ज्येष्ठ गीतकार आणि आंबेडकरी चळवळीला दिशा देणारे लोककवी हरेंद्र जाधव (वय ८७) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. हरेंद्र जाधव यांनी तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता, आता तरी देवा मला पावशील का, माझ्या नवऱ्यानं सोडलिया दारु, पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, यासारखी जवळपास दहा हजार लोकप्रिय गाणी गाणी लिहून मराठी मनावर अधिराज्य गाजविले होते. (famous lyricist harendra jadhav passes away)

गेल्या काही वर्षांपासून हरेंद्र जाधव हे पक्षाघाताने आजारी होते. त्यामुळे ते अंथरुणावरच होते. अखेर प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. हरेंद्र जाधव यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1933 रोजी नाशिकच्या निफाड तालुक्यातील मिग ओझर येथे झाला होता. हरेंद्र जाधव हे पेक्षाने शिक्षक होते. त्याचबरोबर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे प्रभावीत होऊन ते समाजकार्यात ओढले गेले. 

१० हजारहून अधिक गाणी लिहिलीआता तरी देवा मला पावशील का?, तूच सुख कर्ता..तुच दुःख हर्ता, देवा मला का दिली बायको अशी, माझ्या नवऱ्यानं सोडलिया दारू, हा संसार माझा छानं, राव दिला मला देवानं,  सुख ज्याला म्हणतात ते दावशील का? अशी १० हजारहून अधिक गाणी हरेंद्र जाधव यांनी लिहिली आहेत. तसेच, अजित कडकडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे, अनुराधा पौडवालपासून ते बेला सुलाखे, साधना सरगमपर्यंत अनेक गायक, गायिकांनी त्यांची गाणी गायली आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईmusicसंगीत