सरकारी रुग्णालयांत सुविधांची वानवा
By Admin | Updated: April 20, 2016 02:30 IST2016-04-20T02:30:55+5:302016-04-20T02:30:55+5:30
खालापूर तालुक्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये परिचारिका, अपुरे मनुष्यबळ, डॉक्टरांची रिक्त पदे तसेच पुरेशा साधनसामुग्रीचा अभाव असल्याने सरकारी रुग्णालये

सरकारी रुग्णालयांत सुविधांची वानवा
खोपोली : खालापूर तालुक्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये परिचारिका, अपुरे मनुष्यबळ, डॉक्टरांची रिक्त पदे तसेच पुरेशा साधनसामुग्रीचा अभाव असल्याने सरकारी रुग्णालये गैरसोईची ठरत आहेत. तालुक्यातील चारही सरकारी रुग्णालयांमध्ये एकही भूलतज्ज्ञ नाही. त्यामुळे रुग्णांवर शस्त्रक्रिया करताना अडचणी येत असल्याचे परिसरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
गोरगरीब जनता तसेच आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी बांधव या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र सुविधांअभावी गैरसोय होत आहे. आरोग्य विभागाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. तालुक्यातील वावोशी, लोहोप व बोरगाव येथे तालुका प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात एक डॉक्टर, दोन परिचारिका, एक शिपाई व एका सफाई कामगाराची कमतरता आहे. चौकमध्येही अशीच स्थिती असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांसहित ३० जणांची गरज असताना २२ कर्मचारी कार्यतर आहेत. यात १ डॉक्टर, ४ सफाई कामगार ,१ केमिस्टचे पदे भरणे गरजेचे आहे. बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) दररोज १३० ते १५० रुग्ण येतात. महिन्याला ११० ते १२० जणांवर शस्त्रक्रि या होते. नियमित उपचारांसाठी १४० ते १४५ रुग्ण येतात. जवळच महामार्ग असल्याने अपघात, संशयास्पद मृत्यू असे ७ ते ८ रुग्ण दाखल होतात.