शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या भूखंडावर तीन सरकारी संस्थांचा डोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 01:37 IST

तुर्भेमधील राज्य परिवहन मंडळाच्या डेपोचा भूखंड पुन्हा ताब्यात घेण्याच्या हालचाली सिडकोने सुरू केल्या आहेत. या भूखंडावर अवजड वाहनांसाठी वाहनतळ उभारण्याचा विचार सुरू आहे. एसटी महामंडळाने यापूर्वी येथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती.

- नामदेव मोरेनवी मुंबई : तुर्भेमधील राज्य परिवहन मंडळाच्या डेपोचा भूखंड पुन्हा ताब्यात घेण्याच्या हालचाली सिडकोने सुरू केल्या आहेत. या भूखंडावर अवजड वाहनांसाठी वाहनतळ उभारण्याचा विचार सुरू आहे. एसटी महामंडळाने यापूर्वी येथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. आरटीओ विभाग सद्यस्थितीमध्ये येथे कारवाई केलेली वाहने उभी करत असून, बाजार समितीनेही कलिंगड व इतर व्यवसायासाठी भूखंडाची मागणी केली आहे. यामुळे हा भूखंड नक्की कोणाच्या ताब्यात जाणार व त्याचा काय वापर होणार, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवी मुंबई नियाेजनबद्ध शहर असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात शहराच्या नियोजनामध्ये अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत.  राज्य परिवहन मंडळाचा डेपो शहरात उभा करण्यामध्येही सिडको व शासनाला अपयश आले आहे. शहरातून  हजारो प्रवासी प्रति दिन देशभर प्रवास करत असतात. खासगी व एसटी बसेसचा प्रवासासाठी वापर केला जातो, परंतु या प्रवाशांना एकही सुसज्ज बस स्थानक नाही. यामुळे वाशी, सानपाडा, तुर्भे, जुईनगर, नेरुळ व सीबीडीमध्ये महामार्गावरच प्रवाशांना बसेसची वाट पाहावी लागत आहे. सिडकोने यापूर्वी तुर्भे मध्ये दोन भूखंड एसटी महामंडळाला दिले आहेत. फळ मार्केटसमोरील भूखंडावर छोटेसे बस स्थानक सुरूही केले होते, परंतु त्याला फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे या डेपोचा वापर होऊ शकला नाही. मोकळ्या भूखंडाचा अनेक वर्षांपासून वापरच होत नाही.  या भूखंडावर अनेक वेळा फळे पॅकिंग करणारांनी व इतरांनीही अतिक्रमण केले होते. सद्यस्थितीमध्ये हा भूखंड ताब्यात मिळविण्यासाठी तीन सरकारी अस्थापनांमध्ये स्पर्धा सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे. काही महिन्यांपासून आरटीओ कार्यालयाने कारवाई केलेली वाहने या भूखंडावर उभी करण्यास सुरुवात केली आहेत. आरटीओने भूखंड मिळावा, अशी मागणी केली नसली, तरी त्याचा वापर सद्यस्थितीमध्ये त्यांच्याकडून सुरू आहे. सिडको महामंडळाने हा भूखंड राज्य परिवहन विभागाकडून पुन्हा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या ठिकाणी सिडको ट्रक टर्मिनल सुरू करण्याचा विचार करत आहे. दुसरीकडे मुंबई बाजार समितीने हा भूखंड विस्तारित फळ मार्केटसाठी ताब्यात मिळावा, अशी मागणी केली आहे. यामुळे आता हा भूखंड नक्की कोणाला मिळणार व त्याचा वापर काय केला जाणार, याविषयी उत्सुकता लागली आहे. 

बाजार समितीने केला ठराव  मुंबई बाजार समितीने फळ मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी कलिंगड व खरबूजचा व्यापार एसटीच्या भूखंडावर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ठराव मंजूर करून तो पणन विभागाच्या मंजुरीसाठी पाठवून दिला आहे. यामुळे सदर भूखंडावर सदर व्यवसाय स्थलांतर करण्यासाठी परवानगी मिळणार की नाही, याकडेही लक्ष लागले आहे. एसटी डेपो कधी तयार होणार? नवी मुंबईमध्ये खासगी व सरकारी दोन्ही बसेससाठी डेपो सुरू करणे आवश्यक आहे, परंतु सिडकोचे चुकलेले नियोजन, शासनाचे दुर्लक्ष व शहरातील राजकीय सामाजिक संघटना दक्ष नसल्यामुळे अद्याप  राज्य परिवहन मंडळाचा डेपोही तयार झालेला नाही. तुर्भेमधील भूखंड सिडकोने ताब्यात घेतला, तर भविष्यातही बस आगार नवी मुंबईमध्ये होऊ शकणार नाही व त्याचा फटका शहरवासीयांना कायमस्वरूपी बसणार आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईstate transportएसटी