सायबर गुन्हे रोखण्यासाठी तज्ज्ञांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:39 IST2017-08-02T02:39:06+5:302017-08-02T02:39:08+5:30

मुंबई, ठाण्यापेक्षा नवी मुंबईमध्ये आयटी कंपन्यांची संख्या व सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. जेएनपीटीमधील जीटीआय कंपनी

Expertists help prevent cyber crime | सायबर गुन्हे रोखण्यासाठी तज्ज्ञांची मदत

सायबर गुन्हे रोखण्यासाठी तज्ज्ञांची मदत

नवी मुंबई : मुंबई, ठाण्यापेक्षा नवी मुंबईमध्ये आयटी कंपन्यांची संख्या व सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. जेएनपीटीमधील जीटीआय कंपनी, रिलायन्स जिओ व खुद्द पोलिसांचे अधिकृत संकेतस्थळ हॅक झाल्यानंतर पोलीस यंत्रणा अधिक दक्ष झाली असून, या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आयटी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.
जुलै महिन्यामध्ये नवी मुंबई सायबर गुन्ह्यांनी हादरली. देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असलेल्या रिलायन्सच्या जिओ कंपनीचा डाटा हॅक करण्यात आला. याविषयी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला शिताफीने अटक केले. आरोपीने पैसे मिळविण्यासाठी किंवा कंपनीचे नुकसान करण्यासाठी हा गुन्हा केला नसला, तरी मोठ्या उद्योगसमूहाची माहितीही सुरक्षित नसल्याचे त्यामुळे सिद्ध झाले. दुसºया गुन्ह्यामध्ये देशातील तिसºया क्रमांकाचे मोठे बंदर असलेल्या जेएनपीटीमधील जीटीआय कंपनीचे २७० संगणक व लॅपटॉप हॅक करण्यात आले. कंपनीचा सर्व कारभार ठप्प होऊन गेला. या गुन्ह्यामध्ये हॅकर्सने कंपनीकडे खंडणीची मागणी केली असल्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने न्हावा-शेवा पोलीस स्टेशनमध्ये आयटी अ‍ॅक्ट व खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तिसºया घटनेमध्ये हॅकर्सने थेट नवी मुंबई पोलिसांना दणका दिला. एकाच आठवड्यात दोन वेळा पोलिसांचे अधिकृत संकेतस्थळच हॅक करण्यात आले. पोलिसांच्या संकेतस्थळावर काहीही गुप्त माहिती नसली, तरी कायद्याच्या रक्षणकर्त्यांचे संगणक व संकेतस्थळही सुरक्षित नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. जीटीआय कंपनीचे संगणक हॅक केल्याच्या गुन्ह्याचा तपास सायबर सेलकडे हस्तांतर करण्यात आला आहे; परंतु अद्याप या गुन्ह्याचा उलगडा झालेला नाही. नवी मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ हॅक करणाºया आरोपीचाही अद्याप शोध लागलेला नाही. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, नवी मुंबईमध्ये आयटी उद्योग वाढत आहेत. सायबर गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे. नवी मुंबईमधील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र सेल तयार केला आहे. आयटी सेलमधील पोलीस अधिकाºयांसोबत या क्षेत्रामधील तज्ज्ञांचेही गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी सहकार्य घेतले जात आहे. आयटी उद्योगांमधील तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने गुन्ह्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय राज्याच्या आयटी सेलचीही वेळोवेळी मदत घेतली जात आहे. नागरिकांनीही याविषयी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Expertists help prevent cyber crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.