पनवेल मध्ये दुर्मिळ नाणी, स्टॅम्प यांचे प्रदर्शन; समुद्र किनाऱ्यावरील वाळूचे नमुने सुद्धा यावेळी मांडण्यात आले
By वैभव गायकर | Updated: March 25, 2024 16:28 IST2024-03-25T16:28:33+5:302024-03-25T16:28:50+5:30
दोन जवळच्या समुद्र किनाऱ्यावरील वाळूमध्ये दिसणारा फरक या प्रदर्शनात दाखविण्यात आला.सुमारे 150 पेक्षा अधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन कौतुक केले.

पनवेल मध्ये दुर्मिळ नाणी, स्टॅम्प यांचे प्रदर्शन; समुद्र किनाऱ्यावरील वाळूचे नमुने सुद्धा यावेळी मांडण्यात आले
वैभव गायकर
पनवेल: लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे होलिकोत्सवाच्या निमित्ताने कृष्णा गार्डन सोसायटी नवीन पनवेल येथे दुर्मिळ नाणी आणि स्टॅम्प यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. ज्येष्ठ लायन सभासद यशवंत ठाकरे आणि बंसिधर गैरोला यांचे हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
इतिहास संशोधक विजय मनोहर यांनी संग्रह केलेली 600 पेक्षा जास्त दुर्मिळ नाणी आणि 1000 पेक्षा जास्त तिकिटे यावेळी प्रदर्शित करण्यात आली होती. तसेच विविध समुद्र किनाऱ्यावरील वाळूचे नमुने सुद्धा यावेळी मांडण्यात आले होते.
दोन जवळच्या समुद्र किनाऱ्यावरील वाळूमध्ये दिसणारा फरक या प्रदर्शनात दाखविण्यात आला.सुमारे 150 पेक्षा अधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन कौतुक केले. हे प्रदर्शन यशस्वी करण्यात विजय मनोहर यांना मेधा मनोहर, महेश भिसे, सरगम क्लबच्या अध्यक्षा स्वाती गोडसे, मानदा पंडित, प्रेमेंद्र बहिरा, संजय गोडसे, सुयोग पेंडसे यांनी सहकार्य केले. विविध लायन्स क्लबचे सदस्य सुद्धा यावेळी उपस्थित होते.