शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वसाहत विभागातील सेवांचे सुलभीकरण, सिडकोचा महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 00:54 IST

विशेष म्हणजे, त्यासाठी विविध प्रकारची अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात. मात्र, नागरिकांचा हा त्रास कमी होणार आहे.

नवी मुंबई : सिडकोतील वसाहत हा सर्वात महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाशी संबंधित अनेक कामांसाठी नागरिकांना कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. विशेष म्हणजे, त्यासाठी विविध प्रकारची अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात. मात्र, नागरिकांचा हा त्रास कमी होणार आहे. कारण सिडको व्यवस्थापनाने या सेवांचे सुलभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विविध सेवांसाठी सादर कराव्या लागणाºया कागदपत्रांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. येत्या १ जुलैपासून या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे.मालमत्ता हस्तांतर किंवा तारण यासाठी ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे, कायदेशीर वारस हस्तांतर, थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र (नो ड्यू सर्टिफिकेट) आदीसाठी नागरिकांना सिडकोच्या वसाहत विभागात फेºया माराव्या लागतात. त्यासाठी विविध प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यामुळे नागरिकांची दमछाक होते. यासंदर्भात वाढत्या तक्रारीची दखल घेऊन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या सेवांसाठी लागणाºया कागदपत्रांपैकी कोणती कागदपत्रे कमी करणे शक्य आहे, याचा अभ्यास करण्यासाठी एक कृती समिती गठित केली होती. या समितीने हस्तांतर/तारण, ना हरकत प्रमाणपत्र आणि वारस हस्तांतर सेवांसाठी सुचविलेल्या सुधारित प्रक्रियेला लोकेश चंद्र यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार १ जुलैपासून या नवीन प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. नवीन प्रणालीनुसार सदनिकांचे हस्तांतर किंवा तारणाकरिता ना हरकत प्रमाणपत्र देणे किं वा हस्तांतर यासाठी अर्जदाराला आता केवळ गृहनिर्माण संस्थेचे ना हरकत आणि थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण प्रक्रिया आॅनलाइन असणार आहे. शुल्कही आॅनलाइन स्वीकारले जाणार आहे. संबंधित अर्जदाराला त्याच्या ई-मेलवर मागणीनुसार ना हरकत प्रमाणपत्र पाठविले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना यापुढे प्रत्यक्ष कार्यालयात फेºया मारण्याची आवश्यकता भासणार नाही. वसाहत विभागाच्या या सेवा लवकरच प्रत्येक नोडमधील कार्यालयात सुरू करण्यात येणार आहेत.वसाहत विभागाशी संबंधित प्रक्रिया आता सुलभ झाल्याने नागरिकांना एकाच कामासाठी वारंवार सिडको कार्यालयात फेºया माराव्या लागणार नाहीत, तसेच आवश्यक सेवा जलदगतीने मिळणार असल्याने नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे.-लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई