पावसाळ्यापूर्वीच खारघर मधील डांबरीकरण केलेला रस्ता खचला
By वैभव गायकर | Updated: May 29, 2023 20:45 IST2023-05-29T20:45:03+5:302023-05-29T20:45:15+5:30
कंत्राटदाराने केलेल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे

पावसाळ्यापूर्वीच खारघर मधील डांबरीकरण केलेला रस्ता खचला
लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर, पनवेल: खारघर सेक्टर 11 सागरीका सोसायटी समोर रस्ता सोमवार, 29 रोजी खचला. काही दिवसापूर्वीच या रस्त्याचे पालिकेच्या माध्यमातून डांबरीकरण करण्यात आले होते.पावसाळ्यापूर्वीच रस्ता खचल्याने कंत्राटदाराने केलेल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पालिकेच्या माध्यमातून हे डांबरीकरण केले गेले आहे.या खचलेल्या रस्त्यात चारचाकी मालवाहू टेम्पो देखील अडकल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आले आहे.खारघर शहरात सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण सुरु आहे.मात्र पावसाळ्यापूर्वीच रस्ता खचल्याने कंत्राटदारावर कारवाईची मागणी होत आहे.याबाबत प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्याशी संपर्क साधला असता खचलेला रस्ता त्वरित नव्याने बनवन्यात येणार असून पालिकेच्या माध्यमातून घटनास्थळी बॅरीगेट्स लावण्यात येतील असे सांगितले.