शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

पर्यावरणप्रेमींना निवडणूक जाहीरनाम्यात हवी निसर्ग संवर्धनाची हमी; राजकीय पक्षांना खुले पत्र

By नारायण जाधव | Updated: March 9, 2024 18:38 IST

पर्यावरणाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवूनच मतदान, नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी ही मोहीम सुरू केली आहे.

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: पर्यावरण रक्षणासाठी राजकारण्यांना जबाबदार धरण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनासाठी तुम्ही काय करणार, याचा आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात समावेश करावा, ‘पर्यावरणाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मी मतदान करेन’, अशी मोहीम देशपातळीवर सुरू केली आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षांना लिहिलेल्या खुल्या पत्रात, या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि टिकाव सुनिश्चित करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केल्या जाणाऱ्या पक्षीय जाहीरनाम्यात तुम्ही काय कार्यवाही कराल, याबाबत हमी देणारे आश्वासनांचा समावेश करावा, अशी मागणी केली आहे.

नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी ही मोहीम सुरू केली आहे. सर्व विचारधारांचे राजकारणी, मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्षात, पर्यावरणाच्या काळजीसाठी त्यांनी सरसावले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ‘आम्ही आमच्या प्राथमिक शाळांमध्ये निसर्गाच्या संरक्षणाची गरज शिकलो आहोत. परंतु व्यवहारात आपल्यापैकी बहुतेकजण याबाबत अपयशी ठरत आहेत. आमचा अनुभव असा आहे की, राजकारणी पर्यावरणाचा ऱ्हास करून विकासकामे करतात. चारधाम महामार्ग आणि मुंबई महानगर प्रदेशात बेपर्वा विकासासाठी खारफुटी, पाणथळ जागांचा नाश केला जात आहे.’ ‘वारंवार पूर आणि भूस्खलन होऊनही आपण धडा शिकत नाही,’ असे ते म्हणाले. तर निसर्ग आणि पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे त्यांच्या स्वतःच्या जीवनावर आणि आरोग्यावरही परिणाम होईल या वस्तुस्थितीपासून राजकीय नेते पळून जाऊ शकत नाहीत, असे सागरशक्तीचे प्रमुख नंदकुमार पवार यांनी सांगितले.

वॉचडॉग फाउंडेशनच्या गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले की, भारतामध्ये राष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणविषयक चिंता कोणत्याही पक्षास नाही. समृद्ध जैवविविधतेने नटलेल्या महाराष्ट्राला तर तातडीने संरक्षणाची गरज आहे. प्रदूषणामुळे महासागर आणि खाड्या धोक्यात आल्या असून, राज्यातील २८ नद्या शहरी प्रदूषणामुळे नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नेरूळच्या कार्यकर्त्या रेखा सांखला म्हणाल्या की, महाराष्ट्र सरकारच्या राजपत्राच्या पाठिंब्याने सिडको आणि मनपाकडून होणाऱ्या विकास योजनांमुळे होणारा पर्यावरणाच्या नाश नवी मुंबईपेक्षा अधिक कुठेही हे दिसत नाही. तर खारघर वेटलँड आणि हिल्सच्या ज्योती नाडकर्णी यांनी सांगितले की, ‘निसर्गाचा नाश करून होणारा सर्रास विकास शाश्वत नसून त्याचे दुष्परिणाम आपण वेळोवेळी पाहिले आहेत.’

इंदौरस्थित अलायन्स फॉर रिव्हर्स इन इंडिया (एएफआर)चे सहसंस्थापक संजय गुप्ता यांनी निदर्शनास आणले की, पर्यावरणाची काळजी ही औद्योगिकीकरणात अडथळे आणण्यासाठी नाही. पारसिक ग्रीन्स फोरमचे संयोजक विष्णू जोशी यांनी पर्यावरणाची पर्वा न करता, बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल असे डोंगरउतार आणि तळ कापण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईenvironmentपर्यावरण