जगभर उत्साह; वाजू लागल्या जिंंगल बेल्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 02:01 IST2019-12-22T02:01:17+5:302019-12-22T02:01:28+5:30
बुर्ज खलिफाला पुढील वर्षी आव्हान

जगभर उत्साह; वाजू लागल्या जिंंगल बेल्स
प्रत्येक जण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहे. नवीन वर्षात प्रत्येकाला काही नवीन सुरू करण्याची ऊर्जा मिळते. येत्या वर्षात २०२० मध्ये बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. एक बदल म्हणजे, २0२0 मध्ये दुबईमधील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत राहणार नाही. त्या इमारतीची जागा सौदी अरेबियाच्या जेद्दा टॉवरची ही जागा घेईल. या टॉवरचे बांधकाम १ एप्रिल, २0१३ रोजी सुरू झाले होते. जेद्दाह टॉवर किंगडम टॉवर आणि माइल-हाय टॉवर म्हणूनही ही अत्युच्च इमारत ओळखली जाईल.
वास्तविक, ही इमारत २0१८ सालीच पूर्ण होणे अपेक्षित होते, पण ती २0१९ मध्ये पूर्ण करण्यात येईल, असं जाहीर झालं. या जेद्दा टॉवरची लांबी एक किलोमीटर म्हणजे सुमारे ३,३00 फूट असेल. सौदीचे प्रिन्स अलवालीद बिन तलाल हे बुरूज बांधणाºया कंपनीचे (जेद्दा इकॉनॉमिक कंपनी) अध्यक्ष आहेत. जेद्दा टॉवरच्या पायाभरणीसाठी ३ मीटर व्यासाचे तळ बांधण्यात आले, जे जमिनीत १00 मीटर खोलपर्यंत आहेत. जेद्दा टॉवर ही बुर्ज खलिफापेक्षा सुमारे ६00 फूट उंच असेल. जेद्दा टॉवरच्या अधिकृत टिष्ट्वटर हँडलवर संपूर्ण इमारतीवरील सावलीचा परिणाम दर्शविणारा एक फोटो २०१४ साली टिष्ट्वट करण्यात होता. या फोटोवरून इमारतीच्या भव्यतेचा अंदाज घेतला जाऊ शकतो. ही इमारत निवासी हॉटेल म्हणून वापरली जाणार आहे. हा टॉवर २,४५,००० चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेला आहे. त्यात आॅफिससाठी २०० खोल्या, चार सीझन हॉटेल, १२१ सर्व्हिस अपार्टमेंट्स आणि ३६० निवासी अपार्टमेंट्स असतील.