शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

कर्मचाऱ्यांना आता दुसऱ्या घराचा लाभ मिळणार नाही, सिडकोची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 00:36 IST

CIDCO News : सिडको आस्थापनेवर काम करणाऱ्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना पहिले घर घेतल्यानंतर आता दुसऱ्या घराचा लाभ घेता येणार नाही. सिडको व्यवस्थापन यासंदर्भात सुधारित नियमावली तयार करीत असल्याचे समजते.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई : सिडको आस्थापनेवर काम करणाऱ्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना पहिले घर घेतल्यानंतर आता दुसऱ्या घराचा लाभ घेता येणार नाही. सिडको व्यवस्थापन यासंदर्भात सुधारित नियमावली तयार करीत असल्याचे समजते. त्यानुसार कर्मचाऱ्यांना आता एकदाच घर घेता येणार आहे.  त्यामुळे कर्मचाऱ्यांत नाराजीचे सूर पसरले आहेत. (Employees will no longer benefit from a second home, the role of CIDCO)सिडकोच्या विविध विभागांत जवळपास १७०० कर्मचारी कार्यरत आहेत.  सेवेत पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर सिडकोचे घर घेण्यास संबंधित कर्मचारी पात्र ठरतात, तर पंधरा वर्षांनंतर याच कर्मचाऱ्यांना दुसऱ्या घराचा लाभ घेता येतो. विशेष म्हणजे या योजनेत कर्मचाऱ्यांना  कोणतीही आर्थिक सवलत दिली जात नाही. उलट विक्रीविना पडून असलेली घरे इच्छुक कर्मचाऱ्यांना त्या त्या वेळेच्या दरानुसारच दिली जातात. पंधरा वर्षांच्या कालावधीत संबंधित कर्मचाऱ्यांचे कुटुंब वाढते. त्यामुळे त्यांच्या गरजाही वाढतात. हे लक्षात घेऊन सिडकोच्या तत्कालीन व्यवस्थापनाने तीस वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांसाठी ही विशेष योजना सुरू केली होती. याअंतर्गत सेवेत लागल्यापासून पहिल्या पाच वर्षांत एक आणि पंधरा वर्षांनंतर दुसरे घर विकत घेण्याची अनुमती दिली होती.त्यानुसार प्रत्येक कर्मचारी आपल्या आर्थिक क्षमतेनुसार घर घेऊ शकत होता. मात्र सिडकोच्या विद्यमान व्यवस्थापनाने तीस वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रक्रियेला कात्री लावण्याच्या हालचाली सुरू केल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे सिडकोच्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांत नाराजी पसरली आहे. शासकीय सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शासनाचा एक लाभ घेतला असेल तर दुसरा लाभ घेता येणार नाही, असे राज्य सरकारने २०१९ मध्ये जारी केलेल्या अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या याच अध्यादेशाचा अधार घेत सिडकोच्या विद्यमान व्यवस्थापनाने हा निर्णय घेतल्याचे समजते. असे असले तरी सिडको हे राज्य सरकारचा भाग असले तरी ते स्वतंत्र महामंडळ आहे. सिडकोच्या संचालक मंडळावर राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आहेत. कर्मचाऱ्यांना लाभ देण्याची परंपरा जुनी आहे. सिडकोप्रमाणेच इतर महामंडळात कर्मचाऱ्यांच्या लाभाच्या योजना सुरू आहेत.  ही वस्तुस्थिती असताना दुसऱ्या लाभापासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे मत सिडकोच्या काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.  

काय आहे योजना?सिडको कर्मचाऱ्यांना हक्काचे घर घेता यावे, यासाठी सेवेत पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना घर किंवा सोसायटी भूखंड दिला जातो. पंधरा वर्षांची सेवा झाल्यानंतर पुन्हा दुसरे घर घेण्याची अनुमती दिली जाते. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात सोसायटी भूखंडाचा लाभ घेतला असेल तर संबंधित कर्मचाऱ्याला दुसऱ्यांदा घर घेता येत नाही. त्यासाठी त्याला सोसायटीचे सदस्यत्व रद्द करावे लागते. परंतु, पहिल्या टप्प्यात घर घेतले असेल तर दुसऱ्यांदासुद्धा घर घेण्याची मुभा आहे. विशेष बाब म्हणून मागील तीस वर्षांपासून सिडकोत ही योजना राबविली जात आहे.

टॅग्स :cidcoसिडकोEmployeeकर्मचारी