कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी ठेकेदाराकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:06 IST2019-03-10T23:04:50+5:302019-03-10T23:06:13+5:30
बाह्ययंत्रणेद्वारे नोकरभरती; पनवेल महापालिकेचे नवे परिपत्रक

कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी ठेकेदाराकडे
- वैभव गायकर
पनवेल : पनवेल महापालिकेने बोगस भरतीवर लगाम लावण्यासाठी बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी, तसेच संगणकीय चाचणी घेण्यासाठी २९ जानेवारी रोजी परिपत्रक काढले होते. या परिपत्रकात नमूद केलेल्या तारखेपर्यंत संबंधित कंत्राटी कामगारांनी आपले चारित्र्य पडताळणी अहवाल व संगणकावरील टंकलेखन स्पीड, तसेच वाहन चालविण्याची क्षमता आदींचा यामध्ये समावेश होता. मात्र, तारीख उलटून गेल्यानंतर पालिकेने दुसरे परिपत्रक काढून संबंधित कंत्राटदाराला प्रक्रि या पार पाडण्याचे आदेश नव्या परिपत्रकात दिले आहेत.
पालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी काढलेल्या परिपत्रकात २८ फेब्रुवारीपर्यंत पालिकेतील सर्व कंत्राटी कामगारांनी चारित्र्य पडताळणी दाखले सादर करण्याचे आदेश दिले होते. तसेच या कंत्राटी कामगारांमधील वाहन चालक, डेटाएंट्री आॅपरेटर्स यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत संगणकावरील टंकलेखनाची स्पीड टेस्ट तसेच वाहन चालकांची वाहन चालविण्याची क्षमतेची चाचणी पालिकेच्या मार्फत घेतली जाणार होती. बोगस भरतीवर आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. मात्र, पालिकेने स्वत:ची भूमिका बदलत नव्याने परिपत्रक काढत पालिकेत कंत्राटी कामगार पुरविणाºया मे. गुरु जी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला नव्याने कर्मचाऱ्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पनवेल महानगर पालिकेत बाह्ययंत्रणेद्वारे सध्याच्या घडीला २२५ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये शिपाई, डाटा एंट्री आॅपरेटर्स, वाहन चालक, फायरमन आदींसह बहुउद्देशीय कर्मचाºयांचा यामध्ये समावेश आहे. पालिकेने ही जबाबदारी कर्मचारी पुरविणाºया कंत्राटदारावर दिल्याने ही प्रक्रि या कितपत पारदर्शक असेल अशी शंका निर्माण झाली आहे.
पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचाºयांची पडताळणी नाही
पनवेल महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ ग्रामपंचायतींमधील ३२० कर्मचाºयांचा नुकतेच पालिकेत समावेश करण्याचा निर्णय कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने घेतला आहे. मात्र, दोन वर्षे उलटून पालिकेची सेवा बजावत असलेल्या या कर्मचाºयांची चारित्र्य पडताळणी पालिकेने केलेली नाही.
चारित्र्य पडताळणी तसेच इतर चाचण्यांसाठी पालिकेने यापूर्वी काढलेले परिपत्रक कर्मचाºयांसाठी होते. नव्याने काढलेले परिपत्रक हे कंत्राटदारासाठी आहे.
- जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महानगर पालिका
कर्मचारी भरतीपूर्वी पडताळणी का नाही ?
पालिकेत नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांमार्फत महासभेत करण्यात आली आहे. मात्र, तरी देखील कंत्राटदारामार्फत पालिका क्षेत्राबाहेरील भरती केली आहे. भरती करण्यापूर्वीच कर्मचाºयांकडून चारित्र्य पडताळणी का करून घेतल्या जात नाही, हा प्रश्न देखील उपस्थित राहिला आहे .