शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवरील कारवाईबाबतचा संभ्रम दूर करा

By admin | Updated: March 25, 2017 01:42 IST

प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी २0१५ पर्यंतच्या बांधकामांना

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी २0१५ पर्यंतच्या बांधकामांना अभय देण्याची भूमिका जाहीर केली होती. तर प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनानंतर गेल्या आठवड्यात राज्याच्या नगरविकास विभागाने डिसेंबर २0१२ पर्यंतच्या बांधकामांना अभय दिल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांत कमालीचा संभ्रम निर्माण झाला असून, हा संभ्रम दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रकाशझोत सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर ही संघटना कार्यरत आहे. त्यांचे प्रलंबित प्रश्न तडीस नेण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकारने याअगोदर २0१२ पर्यंतच्या बेकायदा बांधकामांना अभय देण्याचे धोरण जाहीर केले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट २0१५पर्यंतची बांधकामे नियमित करण्याची घोषणा वर्षभरापूर्वी केली होती; परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत सिडको महापालिकेने २0१२ नंतरच्या बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. मुख्यमंत्र्यांनी २0१५पर्यंतच्या बांधकामांना अभय दिले असतानाही महापालिका व सिडकोने कारवाई मोहीम सुरूच ठेवल्याने प्रकल्पग्रस्तांतून संताप व्यक्त होत आहे.गेल्या आठवड्यात प्रकल्पग्रस्तांनी सिडको भवन येथे आंदोलन केले. आमरण उपोषण करण्यात आले. याची दखल घेत नगरविकास विभागाने उपोषणकर्त्यांशी चर्चा करून २0१२ पर्यंतच्या बांधकामांवरील कारवाईला स्थगिती दिल्याचे नव्याने जाहीर केले. त्यामुळे उपोषण संपले, आंदोलन शमले. मात्र, प्रकल्पग्रस्तांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी २0१५पर्यंतच्या बांधकामांना अभय जाहीर केले असताना त्याच राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने २0१२पर्यंतच्या बांधकामांवरील कारवाईला स्थगिती दिली आहे. ही बाब सर्वसामान्य प्रकल्पग्रस्तांना बुचकळ्यात टाकणारी आहे. तसेच त्यांची दिशाभूल करणारी असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून २0१५पर्यंतच्या बांधकामांना अभय असल्याचे लेखी स्वरूपातील पत्र प्राप्त करावे, अशी मागणी प्रकाशझोत संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी आमदार संदीप नाईक यांच्याकडे केली आहे. तसेच यासंदर्भातील पत्राची प्रत बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनाही देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)