तीन ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी पोटनिवडणूक

By Admin | Updated: May 10, 2017 00:20 IST2017-05-10T00:20:49+5:302017-05-10T00:20:49+5:30

तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका २७ मे रोजी पार पडणार आहेत. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

By-elections for three Gram Panchayats on May 27 | तीन ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी पोटनिवडणूक

तीन ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी पोटनिवडणूक

पनवेल : तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका २७ मे रोजी पार पडणार आहेत. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमरोली, आपटा, वडघर या तीन ग्रामपंचायतीत पोटनिवडणुका आहेत.
वडघर येथे प्रभाग ६ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव एका जागेसाठी, आपटा येथे प्रभाग ४ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण स्त्री राखीव अशा दोन जागा तर उमरोली येथे प्रभाग २ मध्ये सर्वसाधारण या एका जागेसाठी निवडणूक होत आहे. १२ मे रोजीपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत तहसील कार्यालयात उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. १५ मे रोजी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. तर १७ मे रोजी तहसील कार्यालयात उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दिली आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारांना चिन्ह वाटपही करण्यात येणार आहे.
२७ मे रोजी मतदान प्रक्रि या पार पडणार आहे. २९ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Web Title: By-elections for three Gram Panchayats on May 27