रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची आज निवडणूक
By Admin | Updated: September 21, 2014 00:58 IST2014-09-21T00:58:26+5:302014-09-21T00:58:26+5:30
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक रविवारी पार पडणार आहे.

रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची आज निवडणूक
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक रविवारी पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि शेकापचे सर्वेसर्वा आ. जयंत पाटील या दोन दिग्गज नेत्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष शिवतिर्थावर लागले आहे.
जिल्हा परिषदेवर सध्या शेकाप-शिवसेना यांची सत्ता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे विरोधी बाकावर आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत शेकापने स्वतंत्र उमेदवार उभा करुन शिवसेनेची गोची केल्याने शिवसेना कमालीची संतप्त झाली. लोकसभेच्या निकालानंतर शिवतिर्थावर सत्ता परिवर्तनाचे वारे वाहु लागेल आहेत. शिवसेनेसोबत मांडलेली चूल मोडून शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे नवे समीकरण जन्माला येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्गा परिषदेतील पक्षप्रतोद महेंद्र दळवी यांनी आपली उमेदवारी पक्की समजली आहे. त्यांनी त्या दिशेने प्रयत्नही सुरु केले असून त्यांनी शिवसेनेच्या सदस्यांना हाताशी धरुन अध्यक्षपदाची खुर्ची काबीज करण्याची तयारी केली आहे. परंतु शिवसेनेने मदत करायचे ठरविले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे किती सदस्य दळवी यांच्या पाठीशी ठाम राहतील हे पाहणो औत्सुक्याचे ठरेल. तटकरे यांनी दळवी यांना अध्यक्षपदासाठी तयारी करा असे सांगितल्याचे स्वत: दळवीच सांगत आहे. त्यामुऴे तटकरे यांच्या मनात नेमकी काय राजकीय खेळी सुरु आहे, हे सांगणो अवघड आहे.
शेकापचे जिल्हा परिषद प्रतोद पंडीत पाटील यांनी सदस्यांना व्हीप बजावणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यामुळे शेकापचे सदस्य कारवाईच्या भितीने वाकडे पाऊल टाकणार नाहीत, असे म्हणण्यास वाव आहे. तसेच प्रतोद दळवी यांनाही तटकरेंच्या आदेशाने व्हीप बजावावा लागल्यास दळवी कोणती भूमिका घेतात. हे ही पाहणो महत्वाचे आहे.
तटकरे यांनी शेकापच्या मदतीने अध्यक्षपदी त्यांच्या वहीनी शुभदा तटकरे यांची वर्णी लावल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. असे समिकरण झाले तर, शेकापच्या जिपसदस्य चित्र पाटील या उपाध्यक्ष होतील अशीही चर्चा आहे. शेकाप-राष्ट्रवादी एकत्र आल्यास काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणूकीत जिल्ह्यातील राजकीय समिकरणो बदलण्यास पोषक वातावरण निर्माण होऊ शकते. जिल्हा परिषदेवर ज्याची सत्ता असेल त्यांना जिह्याचे राजकारण करणो सुलभ होणार आहे. सुनिल तटकरे आणि जयंत पाटील हे धुरंदर राजकारणी असल्याने ते दुरदृष्टीचे राजकारण करतील असे सध्या तरी चित्र आहे. प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून शिवतिर्थाच्या 5क्क् मीटर परिसरात प्रवेश निषिध्द करण्यात आला आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावाधीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर 4 वाजेर्पयत निकाल स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)