शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे-नाईक यांच्यात आता 'बॅनरयुद्ध'! 'स्मृतिभ्रंश झालेल्या शिल्पकारांवर मोफत उपचार'; शिंदेंच्या समर्थकांचा बोचरा वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 12:22 IST

Eknath Shinde vs Ganesh Naik: नवी मुंबईत गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद विकोपाला. शिंदे समर्थकांनी शहरात 'स्मृतिभ्रंश झालेल्या शिल्पकारांवर मोफत उपचार'चे बॅनर लावून नाईकांना डिवचले.

नवी मुंबई: नवी मुंबईचे राजकारण सध्या वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील तीव्र संघर्षामुळे ढवळून निघाले आहे. आधी केवळ शाब्दिक चकमकींपुरता मर्यादित असलेला हा वाद आता थेट रस्त्यावरील 'बॅनरयुद्धा'पर्यंत पोहोचला आहे. शिंदे समर्थकांनी शहरात लावलेल्या उपरोधिक बॅनरमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

शिंदेसेनेचे नवी मुंबई संपर्क प्रमुख अंकुश कदम यांनी नवी मुंबईत ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. यावर कोणाचेही नाव थेट न घेता, "स्मृतिभ्रंश झालेल्या स्वयंघोषित शिल्पकारांवर मोफत उपचार करून मिळेल," असा जळजळीत मजकूर लिहिण्यात आला आहे. गणेश नाईक स्वतःला 'नवी मुंबईचे शिल्पकार' मानतात, त्यामुळे हा इशारा थेट त्यांच्याकडेच असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

संघर्षाची पार्श्वभूमी काय?

महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. "टांगा पलटी, घोडे फरार करू" असे खुले आव्हान त्यांनी दिले होते. इतकेच नव्हे तर, खासदार श्रीकांत शिंदे यांना 'माजी खासदार' करण्याचा इशाराही नाईक यांनी दिला होता. या विधानानंतर शिंदे समर्थक कमालीचे आक्रमक झाले असून, आता समाज माध्यमांपासून ते प्रत्यक्ष बॅनरपर्यंत नाईक यांच्या विरोधात मोहीम उघडली गेली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde-Naik rivalry escalates to 'banner war' in Navi Mumbai.

Web Summary : Political tensions rise in Navi Mumbai as Shinde and Naik factions engage in a 'banner war' following critical remarks. Shinde supporters target Naik, who is known as 'sculptor of Navi Mumbai,' with sarcastic banners offering treatment for 'memory loss'.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाGanesh Naikगणेश नाईक