शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

हॉटेलसाठी हवेत आठ हजार कामगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 11:47 PM

वीजबिल, करामध्ये हवी सूट : हॉटेल ओनर्स असोसिएशनची मागणी

अनिकेत घमंडी ।

डोंबिवली : राज्य सरकारने ५ आॅक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेसह हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, आता हॉटेल व्यावसायिकांना कुशल कामगारांची कमतरता भसणार आहे. डोंबिवलीतील २०० विविध हॉटेल, स्नॅक्स बारमध्ये सुमारे आठ हजार कामगार लागतात. परंतु, ते आता लगेच आणायचे कुठून? या विवंचनेत व्यावसायिक आहेत, याकडे डोंबिवलीतील हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

असोसिएशनचे अध्यक्ष अजित शेट्टी म्हणाले, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे हॉटेल पूर्णत: बंद होती. पुढे ती फक्त पार्सल देण्यापुरतीच खुली झाली. यामुळे आचारी व बहुतांश कर्मचारी एप्रिलमध्येच गावी गेले. परिणामी, चांगले आचारी व अन्य कर्मचारी मिळणे कठीण आहे. अजूनही शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने कामगार यायला तयार नाहीत. त्यात जे कामगार आले आहेत, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागत आहे.’ ‘बहुतांश हॉटेलच्या जागा भाडेतत्त्वावर आहेत. त्यामुळे जागाभाडे तसेच वाणिज्य दराने वीजबिल, पाणीबिल व मालमत्ताकर कसा भरावा, या चिंतेने व्यावसायिक त्रस्त आहेत. अन्य घटकांप्रमाणे हॉटेल व्यावसायिकांनी पुन्हा उभारी घेण्यासाठी सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे. सहा महिन्यांचे जागाभाडे, मालमत्ताकर, वीजबिल यामध्ये सूट द्यावी. एखाद्या कामगाराला बाधा झाल्यास त्याला पालिका रुग्णालयात विनामूल्य उपचार मिळावेत. तसेच पुन्हा पूर्ण हॉटेल बंद करण्यासंदर्भात निर्णय घेऊ नये,’ अशी मागणी त्यांनी केली.नियम पाळताना करावी लागणार कसरतहॉटेल पुन्हा सुरू करताना नियम पाळावे लागणार आहेत. ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, कमी टेबल ठेवणे, हे करावे लागणार आहे.अनेक हॉटेलमध्ये मुबलक जागाही नाही. तसेच ग्राहक पूर्वीसारखे येतील का, हा एक प्रश्न आहे. आरोग्याचा विचार करता सर्व कर्मचाºयांना एकावेळी पूर्ण क्षमतेने कामावर ठेवता येणार नाही.तसेच त्यांचे निवास, भोजन, कपडे यासाठीही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यांच्या वेतनासाठीही मोठी तजवीज करावीलागणार आहे, असे शेट्टी म्हणाले.

टॅग्स :hotelहॉटेलNavi Mumbaiनवी मुंबई