शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

ख्रिश्चन वास्तूमध्ये ईदची नमाज, एकात्मतेचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 1:36 AM

शनिवारी ऐन ईदच्या नमाजावेळी पाऊस आल्याने सीवूडमधील मुस्लीम बांधवांपुढे अडचण निर्माण झाली होती. या वेळी ख्रिश्चन धर्मगुरूंनी त्यांना नमाजासाठी वास्तू उपलब्ध करून दिली.

नवी मुंबई : शनिवारी ऐन ईदच्या नमाजावेळी पाऊस आल्याने सीवूडमधील मुस्लीम बांधवांपुढे अडचण निर्माण झाली होती. या वेळी ख्रिश्चन धर्मगुरूंनी त्यांना नमाजासाठी वास्तू उपलब्ध करून दिली. त्यानुसार सर्वधर्म समभावनेचा संदेश देत त्या ठिकाणी ईद साजरी करण्यात आली.यंदा रमजान महिना पावासाळ्यात आल्याने शनिवारी ईदच्या नमाजावेळी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ठिकठिकाणी उघड्यावर पडल्या जाणाऱ्या नमाजात अडथळा निर्माण झाला होता. असाच प्रसंग सीवूड परिसरातील मुस्लीम बांधवांपुढे निर्माण झाला होता.नमाजाच्या ठिकाणी पावसाने चिखल झाल्याने नमाज कुठे पढायची, असा त्यांना प्रश्न पडला होता. या वेळी काही मुस्लीम बांधवांनी मातृमिलन सेंटरचे प्रमुख ख्रिश्चन धर्मगुरू फादर सुनील यांची भेट घेतली. त्यांनी वस्तुस्थिती मांडताच फादर सुनील यांनी ख्रिश्चन धर्मीयांच्यावापरासाठी असलेल्या वास्तूचा तळमजला मुस्लीम बांधवांना ईदची नमाज पठण करण्यासाठी उपलब्ध करून दिला.त्यानुसार मातृमिलन कम्युनिटी सेंटरमध्ये मोठ्या संख्येने मुस्लीम बांधवांनी उपस्थित राहून नमाज पठण केले. त्यानंतर विभागातील शिवसेना पदाधिकाºयांनी मुस्लीम बांधवांना गुलाब पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी मौलाना साकीब, मातृमिलन कम्युनिटी सेंटरचे फादर सुनील, शिवसेना विभागप्रमुख सुमित्र कडू, उपविभागप्रमुख राजेंद्र मोकला, राजेश घाडगे, परिवहन समिती सदस्य समीर बागवान, प्रकाश राणे, सुरेश माळवे, मुबीन काझी, विद्याधर महाडेश्वर, गणेश कांबळे, जितेंद्र कोंडस्कर, दत्ता साबळे आदी सर्वधर्मीय बांधव उपस्थित होते.