शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 1:07 AM

शहरात ४०हजार कुटुंबीयांना लाभ मिळणार : ई-कार्डसाठीही पालिका पाठपुरावा करणार

नवी मुंबई : प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा महापालिका क्षेत्रातील ४0,३६३ कुटुंबांना लाभ होणार आहे. योजनेत सहभागी होणाऱ्यांना प्रतिकुटुंब ५ लाखापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण प्राप्त होणार असून योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राज्यात २३ सप्टेंबर २0१८ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सामाजिक, आर्थिक व जातीय जनगणनेमधील कचरावेचक, घरकाम करणारे, फेरीवाले, बांधकाम मजूर, कारागीर अशा ११ वर्गातील एकूण ८३.७२ लाख कुटुंबांचा समावेश आहे. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ४0,३६३ कुटुंबांचा समावेश असून १,७२,३९३ इतके लाभार्थी या योजनेकरिता पात्र आहेत. लाभार्थी कुटुंबांना प्रतिवर्ष ५ लाखपर्यंत विमा संरक्षण लाभणार आहे. यामध्ये सर्जिकल व मेडिकल उपचार मान्यताप्राप्त खासगी व शासकीय रुग्णालयामार्फत उपलब्ध होणार आहेत. योजनेमध्ये लाभार्थ्यांचा पाठपुरावा करून ई-कार्ड देण्याकरिता महापालिकेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी व आपले सरकार धारक यांची समन्वय सभा मुख्यालयात उपआयुक्त अमोल यादव यांच्या उपस्थितीत पार पाडली.सभेमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, अपघात वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, समन्वय राज्य हमी सोसायटी प्रवीण मोटे, जिल्हा व्यवस्थापक ठाणे अमोल निमसे उपस्थित होते. या मोहिमेमध्ये नागरी प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व सिटीजन सर्व्हिस सेंटर यांनी एकत्रितपणे जबाबदारी स्वीकारून लाभार्थ्यांना ई-कार्ड मिळेपर्यंत पाठपुरावा करावा, मोहीम १00 टक्के यशस्वीपणे राबविण्याचे निर्देश उपआयुक्त अमोल यादव यांनी दिले.