शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

कर्नाळा अभयारण्यात ‘इको टुरिझम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 22:57 IST

पालकमंत्र्यांसमोर प्रकल्पाचे सादरीकरण

- अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : पनवेलमधील कर्नाळा पक्षी अभयारण्यात दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. पर्यटनस्थळ म्हणून या क्षेत्राचा विकास करण्यासाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात येत असून आता इको टुरिझम विकसित करण्यात येणार आहे.

निसर्ग पर्यटन विकास मंडळाकडून पाच कोटींचा निधी मंजूर सुध्दा झाला आहे. परंतु याकरिता साडेअकरा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोर आराखड्याचे सादरीकरण केले. याकरिता लागणाºया उर्वरित निधीसाठी राज्याचे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मुंबईपासून काही तासाच्या अंतरावर असलेल्या कर्नाळा उंचावर असल्याने येथील हवाही नेहमी थंड असते. कर्नाळा अभयारण्यात दोन प्रकारची वने आहेत. याशिवाय, रानखाटीक, ठिपकेवाला सातभाई, कस्तुर, शिंपी, गिधाड, मुनिया, नाचन, सुगरण, बया, सुरेल, खाचू कवटा, राखी धोबी, भारतव्दाज, शामा, मोर, फुलटोचा, पावशा,बहिरा, कापशी घार, नीळकंठ पोपट, सूर्यपक्षी, हरियल यासारखे सुमारे १३४ प्रजातीचे स्थानिक तर ३८ प्रजातीचे स्थलांतरीय पक्षी आहेत.

मुंबई- गोवा महामार्ग बाजूने जात असल्याने पर्यटकांसह प्रवासीही याठिकाणी आवर्जून थांबतात. याठिकाणी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.के राव, ठाणे येथील वन्यजीव संरक्षण अधिकारी दादासाहेब शेडगे यांनी पुढाकार घेवून इको टुरिझमची संकल्पना मांडली . त्यानुसार वास्तुविशारद इंद्रजीत नागेशकर यांनी आराखडा तयार केला आहे. तो निसर्ग पर्यटन महामंडळाकडे गतवर्षी सादर करण्यात आला होता. त्यानुसार यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. परंतु हा प्रकल्प पूर्णत्वास करण्यासाठी साडेअकरा कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर वनपरिक्षेत्र अधिकारी पी. पी. चव्हाण यांनी, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे दोन दिवसापूर्वी प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण केले. यासाठी लागणारा उर्वरित निधी आपण राज्य शासनाकडून उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन चव्हाण यांनी दिले. यावेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीच्या विश्वस्त महेश बालदी उपस्थित होते.कर्नाळा अभयारण्यातील प्रस्तावित सुविधासुरक्षा केबिन, चेंजिंग रूम, उपाहारगृह, ९ डी थिएटर, संग्रालय, युवक गृह, कॉटेज, अ‍ॅडव्हेंचर पार्क, डेक, ट्री हाऊस, पाथ वे, लाकडी ब्रिज, व्ही.व्ही. विंग, धबधबे आदी सुविधा या ठिकाणी आहेत. याकरिता दहा ते पंधरा एकर जागेची आवश्यकता आहे. ती अभयारण्यात उपलब्ध असून रोडच्या पश्चिम भागात हा प्रकल्प राबवला जाणार आहे.कर्नाळ्याच्या ट्रेकिंगचा थरारवयोवृध्द, अपंग त्याचबरोबर महिलांना ट्रेकिंग करता येणे कठीण आहे. अशांना कर्नाळा किल्ल्याच्या सैरचा अनुभव ९ डी थिएटरमध्ये घेता येणार आहे. त्या अनुषंगाने सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.