माथेरानमध्ये लवकरच धावणार ई-रिक्षा ?

By Admin | Updated: February 17, 2016 02:19 IST2016-02-17T02:19:15+5:302016-02-17T02:19:15+5:30

येथील ब्रिटिशकालीन हातरिक्षा माणसाने माणसाला ओढून न्यायचे साधन आजमितीपर्यंत सुरू असून ही अमानवीय प्रथा बंद व्हावी, यासाठी मागील तीन वर्षांपासून येथील

E-rickshaw to run soon in Matheran? | माथेरानमध्ये लवकरच धावणार ई-रिक्षा ?

माथेरानमध्ये लवकरच धावणार ई-रिक्षा ?

माथेरान : येथील ब्रिटिशकालीन हातरिक्षा माणसाने माणसाला ओढून न्यायचे साधन आजमितीपर्यंत सुरू असून ही अमानवीय प्रथा बंद व्हावी, यासाठी मागील तीन वर्षांपासून येथील प्राध्यापक सुनील शिंदे हे शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. येथे पर्यावरणपूरक बॉटरी (ई -रिक्षा) रिक्षा सुरू होण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे येथे ई-रिक्षा सुरू होणार असल्याचे संकेत प्राप्त होत असल्याने श्रमिक हातरिक्षा चालकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. ई-रिक्षा सुरू करण्यासाठीचा प्रारूप आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोकण विभागाचे आयुक्त यांच्याकडे महसूल शाखेने दिलेली आहे.
माथेरानच्या हातरिक्षा ओढणाऱ्या श्रमिकांना या अमानवीय प्रथेतून मुक्ती देण्याच्या हेतूने शासनाने पाऊल उचलले आहे. महसूल खात्याने १९५९ मध्ये माथेरान नियमावलीची अधिसूचना जारी केली होती. नियम ४३ अन्वये येथे मोटार वाहनास बंदी घालण्यात आली असून, वाहतुकीसाठी घोडा व माणसाने ओढावयाच्या हातरिक्षाला परवानगी आहे. ही दोन्ही वाहने मध्यमयुगीन आहेत. यासाठी पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करण्याची मागणी श्रमिक रिक्षा संघटना सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मागील तीन वर्षांपासून सातत्याने करीत आहे. एकूण ९४ रिक्षा परवानाधारक आहेत. ई-रिक्षा सुरू झाल्यासच श्रमिकांना या अमानुष प्रथेतून मुक्ती मिळणार आहे, असे संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, प्रकाश सुतार, संतोष शिंदे, अनिल नाईकडे यांनी सांगितले.

Web Title: E-rickshaw to run soon in Matheran?