खारघरमध्ये घाणीचे ढिगारे
By Admin | Updated: June 14, 2016 01:32 IST2016-06-14T01:32:23+5:302016-06-14T01:32:23+5:30
सिडकोच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून परिसरातील कचरा उचलण्यात येत नसल्याने दिवसेंदिवस खारघरमधील कचऱ्याची समस्या गंभीर होत आहे.

खारघरमध्ये घाणीचे ढिगारे
पनवेल : सिडकोच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून परिसरातील कचरा उचलण्यात येत नसल्याने दिवसेंदिवस खारघरमधील कचऱ्याची समस्या गंभीर होत आहे.
तीन ते चार दिवस कचरा उचलला न गेल्याने खारघरमधील काही भागांत कचऱ्याचे ढीग पडलेला दिसतात. त्यामुळे दुर्गंधीही पसरत आहे. बुर्बी गावालगत असलेल्या सेक्टर १९ वसाहत परिसरात मागील चार ते पाच दिवसांपासून कचऱ्याचे ढीग पाहावयास मिळत आहे. या ठिकाणच्या कचराकुंड्या चोरीला गेल्याचे काही रहिवासी रस्त्यावर कचरा टाकत आहे. पावसाळा तोंडावर आला असताना अधूनमधून बरसणाऱ्या पावसामुळे कचरा सडत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत रहिवाशांकडून वारंवार तक्रार करण्यात आली असली तरी सिडकोकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. यासंदर्भात सिडकोचे कचरा व्यवस्थापन अधिकारी के. बिर्मोडे यांच्याशी संपर्क साधला असता पाहणी करून त्वरित कचरा उचलला जाईल, असे त्यांनी सांगितले.