दुर्गोत्सवाला बसणार महागाईची झळ !

By Admin | Updated: October 5, 2015 00:58 IST2015-10-05T00:58:16+5:302015-10-05T00:58:16+5:30

नवरात्रोत्सवाला अवघा आठवडाभराचा अवधी उरलेला असताना शहरातील विविध दुर्गोत्सव मंडळांत धामधूम सुरू झाली आहे. शहरात विविध भागातील मूर्तिकार

Durgatoswala sit down to inflation! | दुर्गोत्सवाला बसणार महागाईची झळ !

दुर्गोत्सवाला बसणार महागाईची झळ !

प्राची सोनवणे, नवी मुंबई
नवरात्रोत्सवाला अवघा आठवडाभराचा अवधी उरलेला असताना शहरातील विविध दुर्गोत्सव मंडळांत धामधूम सुरू झाली आहे. शहरात विविध भागातील मूर्तिकार दुर्गा देवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहेत. एकीकडे महागाईने आधीच नागरिक त्रस्त झालेले असताना यावर्षी दुर्गादेवीच्या मूर्तींच्या किमतीमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. मूर्ती घडविताना लागणाऱ्या कच्चा मालाच्या किमतीत वाढ झाल्याने ही दरवाढ झाल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली.
साधारणत: विघ्नहर्त्या गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर दुर्गादेवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी सुरुवात केली जाते. यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुर्गादेवीच्या मूर्तींचे भाव २५टक्क्यांनी वाढले आहेत. देवीची मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी माती, सुतळी, लाकूड, आभूषणे, रंग, तणस आदी वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. यावर्षी २००० रु पयांपासून १६०० हजार रु पयांपर्यंत दुर्गादेवीच्या मूर्ती विक्र ीला आहेत. गणपतीच्या मूर्ती तयार करण्यासाठी जेवढी मेहनत लागत नाही त्यांच्या दुपटीने मेहनत व वेळ दुर्गा देवीची मूर्ती घडविण्यासाठी लागतो. दुर्गादेवीला आभूषणे बरीच चढविली जातात. मध्यप्रदेश, छत्तीसगडसह विदर्भात सावनेर, खापरखेडा, उमरेड, भंडारा, यवतमाळ या ठिकाणाहून मूर्तीची मागणी आहे. शहरात अनेक ठिकाणी दुर्गा उत्सव साजरा केला जातो. दुर्गादेवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी जागा बरीच लागत असल्यामुळे जेवढी मागणी तेवढ्याच मूर्ती तयार केल्या जातात, अशी माहिती सीवूड्स -दारावे येथील सायली कला केंद्रातील मूर्तिकार जनार्दन नाईक यांनी दिली. मूर्तीचे साचे बनविण्यासाठी लागणाऱ्या शाडूच्या मातीसाठी मूर्तिकारांना खिशातून १८० ते २२० रुपये खर्च करावे लागत असल्याची माहिती नाईक यांनी दिली. अप्रत्यक्षपणे या साऱ्याचा ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड पडणार असल्याचे पहायला मिळते.
पर्यावरण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मूर्ती पाण्यात विरघळण्यासाठी प्लास्टर आॅफ पॅरिसमध्ये वापरल्या जाणाऱ्या जिप्समची गोणी ३०० ते ३५० रुपयांना विकत घ्यावी लागत आहे. तसेच काबोलच्या एका बंडलची किंमत ८५० ते ९०० च्या घरात पोहोचली आहे. ग्राहकांची नैसर्गिक रंगांना असलेल्या पसंतीमुळे इतर रंगाच्या तुलनेत या रंगाच्या दरातही वाढ झाली
आहे.

Web Title: Durgatoswala sit down to inflation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.