डम्पिंग ग्राउंडचे दूषित पाणी शेतात
By Admin | Updated: July 13, 2016 02:12 IST2016-07-13T02:12:29+5:302016-07-13T02:12:29+5:30
तळोजातील सिडको डम्पिंग ग्राउंडच्या मागच्या संरक्षण भिंतीतून कचऱ्याचे दूषित पाणी बाजूच्या शेतात शिरल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

डम्पिंग ग्राउंडचे दूषित पाणी शेतात
तळोजा : तळोजातील सिडको डम्पिंग ग्राउंडच्या मागच्या संरक्षण भिंतीतून कचऱ्याचे दूषित पाणी बाजूच्या शेतात शिरल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सध्या पावसाने चांगलाच जोर धरल्याने भातपेरणीची कामे जोमात सुरू आहेत. मात्र शेतात रसायनमिश्रित काळे पाणी शिरल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सिडकोने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
गेल्या चार महिन्यांपासून तळोजा डम्पिंग व रामिक प्रकल्पाविरोधात आंदोलन सुरू आहे. सद्गुरू वामनबाबा पै समितीकडून याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. डम्पिंग ग्राउंडमुळे प्रदूषण होत असून, आरोग्याच्या समस्या बळावल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. याशिवाय येथील दूषित पाणी शेतामध्ये शिरून शेतीची नासाडी होत आहे. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाहणी केली असून, पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.