अंबरनाथ आणि बदलापूरच्या महापालिकेला भाजपाचाच खोडा

By Admin | Updated: December 10, 2015 01:54 IST2015-12-10T01:54:50+5:302015-12-10T01:54:50+5:30

अंबरनाथ-बदलापूर या दोन्ही शहरांची एकच महापालिका करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकुलता दाखवलेली असताना आणि तसे विधानसभेत जाहीर केलेले

Dump BJP's Ambernath and Badlapur municipal corporation | अंबरनाथ आणि बदलापूरच्या महापालिकेला भाजपाचाच खोडा

अंबरनाथ आणि बदलापूरच्या महापालिकेला भाजपाचाच खोडा

पंकज पाटील, बदलापूर
अंबरनाथ-बदलापूर या दोन्ही शहरांची एकच महापालिका करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकुलता दाखवलेली असताना आणि तसे विधानसभेत जाहीर केलेले असतानाही बदलापूरमधील भाजप नेत्यांनी घरचा अहेर देत दोन्ही शहरांची महापालिका करण्यास विरोध दर्शवला आहे. दोन्ही शहरांची एकत्र महापालिका झाली तर अंबरनाथमध्ये वरचढ असलेली शिवसेना बदलापूरमध्येही पक्षाचे प्राण कंठाशी आणेल, असे सांगत दोन्ही शहरांच्या दोन स्वतंत्र महापालिका कराव्या अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बदलापूरमधील राष्ट्रवादीने भाजपच्या स्ूारात सूर मिसळला असला, तरी शिवसेनेने मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे. अंबरनाथमध्ये मात्र भाजपची स्थिती फारशी भक्कम नसल्याने तेथे विरोधाची धार एवढी तीव्र नाही.
अंबरनाथ आणि बदलापूरच्या एकत्रित महापालिकेचा प्रस्ताव गेली पाच वर्षे चर्चेत होता. यंदाच्या नगरपालिका निवडणुकीनंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. निवडणुकांना सहा महिने उलटत नाही तो पुन्हा राज्य सरकारने महापालिकेचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे जाहीर केल्याने खास करून बदलापूरच्या भाजप नेत्यांत अस्वस्थता आहे.
विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर महापालिकेच्या विषयाला नव्याने तोंड फुटले आहे. बदलापूरमधील भाजपचे गटनेते राजन घोरपडे यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. भाजपची सत्ता असली तरी बदलापूरकरांचा विचार करुन आम्ही निर्णयाला विरोध केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अंबरनाथ काँग्रेसने या निर्णयाचे स्वागत केले आहे. शहरांच्या विकासाचा हा निर्णय आहे. भाजपचा विरोध राजकीय स्वार्थासाठी आहे. दोन्ही शहरांची एकत्रित माहापालिका झाल्यास ताकद कमी होईल, या भीतीपोटी ते विरोध करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक उमेश पाटील यांनी केला आहे.

Web Title: Dump BJP's Ambernath and Badlapur municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.