केंबुर्ली वळणाचे रुंदीकरण होऊनही धोका कायम
By Admin | Updated: November 29, 2014 22:24 IST2014-11-29T22:24:25+5:302014-11-29T22:24:25+5:30
मुंबई-गोवा महामार्गावरील केंबुर्ली गावाजवळ असलेल्या धोकादायक वळणावर गेली अनेक वष्रे अपघात होत आहेत. या धोकादायक वळणाचे रुंदीकरण करण्यात आले

केंबुर्ली वळणाचे रुंदीकरण होऊनही धोका कायम
दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील केंबुर्ली गावाजवळ असलेल्या धोकादायक वळणावर गेली अनेक वष्रे अपघात होत आहेत. या धोकादायक वळणाचे रुंदीकरण करण्यात आले असले तरी अवघड वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघातांचा धोका कायम आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा एक कार या वळणाचे कठडे तोडून नदीत कोसळल्याची घटना घडली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली गाव आणि महाड शहरादरम्यान महामार्गाला एक धोकादायक वळण आहे. या ठिकाणी नदीला लागूनच रस्ता पुढे गेला आहे. महाड शहराला जोडणारा जोडरस्तादेखील याच ठिकाणी आहे. यामुळे येथे कायम अपघात होत असतात. गेल्या अनेक वर्षात या वळणावर अनेक अपघात झाले असून या अपघातांमध्ये मोठय़ा प्रमाणात जीवितहानी झालेली आहे. कायम अपघात होत असल्याने महामार्ग बांधकाम विभागाने या ठिकाणी असलेला एका बाजूचा डोंगर फोडून रस्ता रुंद करण्याचे काम केले होते. मात्र रुंदीकरणामुळे हे वळण अधिकच धोकादायक बनले आहे. यामुळे या वळणावर आजही अपघातांचे प्रमाण कायम राहिले आहे.
या वळणावर असलेले हे सिमेंट काँक्रीटचे संरक्षक कठडे रात्रीच्या वेळेस चालकांना स्पष्ट दिसत नाहीत. कठडय़ांना रेडीयम पट्टे बसवण्यात आलेले नाहीत. या वळणावर असलेली डोंगराकडच्या साइडपट्टीला खड्डे पडले आहेत. तर महाड शहराला जोडणा:या जोड रस्त्यासमोर खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवण्याच्या प्रय}ातही अनेक अपघात होत आहेत.
केंबुर्ली वळणावर जानेवारी 2क्क्9 पासून आतार्पयत जवळपास 35 अपघात झाले आहेत. काही अपघात किरकोळ असल्याने याची नोंद करण्यात आलेली नाही. या किरकोळ अपघातांचा आकडादेखील किमान 25 पेक्षा अधिक आहे. (वार्ताहर)