पालीत एटीएम बंदमुळे भाविकही अडचणीत

By Admin | Updated: November 16, 2016 04:45 IST2016-11-16T04:45:56+5:302016-11-16T04:45:56+5:30

वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या विद्यार्थ्यांनी बालदिनानिमित्त पामबीच मार्गालगत

Due to the shutting down of ATMs in Pali, devotees face trouble | पालीत एटीएम बंदमुळे भाविकही अडचणीत

पालीत एटीएम बंदमुळे भाविकही अडचणीत

नवी मुंबई : वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या विद्यार्थ्यांनी बालदिनानिमित्त पामबीच मार्गालगत असलेल्या झोपडपट्टी परिसरातील मुलांना भेट देऊन त्यांच्यासोबत बालदिन साजरा केला. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या पॉकेटमनीमधून जमवलेल्या पैशांतून या मुलांना वह्या तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना भेटवस्तू दिल्यानंतर त्या मुलांच्या चेहऱ्यावरी जे हास्य खुलले ते प्रत्येकासाठी अनमोल ठरल्याची प्रतिक्रिया श्रीकांत जाधव या विद्यार्थ्याने व्यक्त केली. एनएसएस युनिटच्या माध्यमातून वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात असून भावी पिढीने समाजाच्या बदलासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही जाधव याने सांगितले. या उपक्रमांतर्गत मुलांसोबत विविध खेळ खेळण्यात आले, त्यांचे मनोरंजन करून त्यांना खाऊवाटपही करण्यात आले.

Web Title: Due to the shutting down of ATMs in Pali, devotees face trouble