रेल्वे सेवेमुळे उरणच्या विकासाला गतीे,  वाहतूककोंडी कमी होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 03:56 AM2018-11-10T03:56:43+5:302018-11-10T03:57:24+5:30

उरण रेल्वेच्या पहिल्या टप्प्याचे रविवारी उद्घाटन होत आहे. रेल्वे वाहतुकीमुळे तालुक्याच्या विकासाला गती येणार आहे. जेएनपीटी मार्गावरील वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी होणार असून बांधकाम  व्यवसायाला सुगीचे दिवस येणार आहेत.

Due to the railway service, the development of urine will reduce the speed, traffic congestion | रेल्वे सेवेमुळे उरणच्या विकासाला गतीे,  वाहतूककोंडी कमी होणार 

रेल्वे सेवेमुळे उरणच्या विकासाला गतीे,  वाहतूककोंडी कमी होणार 

Next

नामदेव मोरे  
नवी मुंबई -  उरण रेल्वेच्या पहिल्या टप्प्याचे रविवारी उद्घाटन होत आहे. रेल्वे वाहतुकीमुळे तालुक्याच्या विकासाला गती येणार आहे. जेएनपीटी मार्गावरील वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी होणार असून बांधकाम  व्यवसायाला सुगीचे दिवस येणार आहेत. उलवेसह परिसरातील घरांच्या किमतीमध्येही वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. 
शासनाने १९८९ मध्ये जेएनपीटी बंदर सुरू केले. जवळपास तीन दशकांच्या वाटचालीमध्ये देशातील प्रमुख बंदर म्हणून जेएनपीटीचा नावलौकिक झाला आहे. येथील रोजगारामध्ये वाढ झाली असली तरी वाहतुकीची साधने नसल्यामुळे या परिसराचा विकास आवश्यक गतीने होवू शकला नाही. या मार्गावरील प्रचंड वाहतूककोंडीमुळे प्रवाशांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होवू लागली होती. कोंडी सोडविण्यासाठी उरण रेल्वे प्रकल्पाची मागणी होवू लागली होती. शासनाने १९९७ मध्येच या मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्यासाठीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ४९५ कोटी रुपये खर्च होणार होते, परंतु विविध कारणांनी हा प्रकल्प रखडत गेला व खर्चाचा आकडा तब्बल १७८२ कोटींवर पोहचला. जमीन संपादन व वनविभागाच्या अडथळ्यामुळे निर्धारित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होवू शकला नव्हता. सर्व अडचणींवर मात करून पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात आले असून ११ नोव्हेंबरला प्रत्यक्ष रेल्वे सेवा सुरू होणार आहे. यामुळे उरणवासीयांचे २० वर्षांचे स्वप्न साकार होणार आहे. सिडकोने विकसित केलेल्या उलवे नोडमधील सेक्टर २, ३, ९, १९, २०, २१, २२ व २३ मध्ये नागरिक वास्तव्यासाठी गेले आहेत. रेल्वे सेवा नसल्यामुळे या नागरिकांची प्रचंड गैरसोय होवू लागली होती. रिक्षा, एनएमएमटी बस, एसटी व खासगी वाहतुकीवर या परिसरातील नागरिकांना विसंबून राहावे लागत होते. गैरसोयीमुळे अनेकांनी घरे विकत घेवूनही तेथे वास्तव्यास जाण्याचे टाळले होते. रेल्वे सुविधेमुळे या सर्वांची गैरसोय दूर होणार आहे. 
उरण रेल्वेच्या पहिल्या टप्प्यामुळे विमानतळ परिसर व संपूर्ण उरण तालुक्यामध्ये बांधकाम व्यवसायाला गती येणार आहे. उलवे नोडमधील सर्व सेक्टरचे बांधकाम वेगाने होणार आहे. याशिवाय उरणपर्यंतच्या सर्व रेल्वे स्टेशन परिसरातील कामांना गती येणार आहे. बांधकामांचे दरही वाढण्याची शक्यता आहे. दोन वर्षापूर्वी उलवेमध्ये ५१०० रुपये प्रतिचौरस फूट दराने घरांची विक्री होत होती. रेल्वेमुळे हा दर ७ हजार रुपयांवर गेला आहे. 



१७८२ कोटींचा प्रकल्प

नवी मुंबई ते उरण या रेल्वे प्रकल्पासाठी १७८२ कोटी रुपये खर्च होणार आहेत. २७ किलोमीटर लांबीच्या रेल्वे प्रकल्पाचा ६७ टक्के खर्च सिडको व ३३ टक्के खर्च मध्य रेल्वे करणार आहे. या मार्गावर एकूण १० रेल्वे स्टेशन असणार आहेत. पूर्ण मार्गावर ४ मोठे पूल आहेत. ७८ छोटे पूल व १५ भुयारी मार्ग असणार आहेत. 

पहिला टप्पा
सीवूड ते खारकोपर व सीबीडी ते खारकोपर दरम्यान १२ किलोमीटरचा पहिला टप्पा आहे. या मार्गावर सीवूड, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर ही रेल्वे स्टेशन असणार आहेत. 
२०१९ पर्यंत दुसऱ्या टप्प्याचे काम 
दुसरा टप्पा १० किलोमीटरचा असणार आहे. मध्य रेल्वेने या मार्गावरील गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी-उरण या स्टेशनचे बांधकाम सुरू केले आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

जेएनपीटीसह विमानतळ परिसराचा विकास 
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी उरण रेल्वेविषयी माहिती देताना सांगितले की, दोन टप्प्यामध्ये रेल्वे मार्गाचे काम केले जात असून पहिल्या टप्प्याची उभारणी सिडकोने केली आहे. दुसºया टप्प्याचे काम रेल्वे प्रशासन करत असून  ते कामही गतीने सुरू आहे. उरण मार्गावर रेल्वे सुरू झाल्यामुळे विमानतळ परिसर व जेएनपीटी परिसरातील विकासाला गती येणार आहे. या परिसरातील विकास यापुढे अधिक वेगाने होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे उलवे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बस किंवा रिक्षावर अवलंबून राहावे लागत होते. रेल्वेमुळे वाहतूक सुरळीत होणार आहे. जेएनपीटी मार्गावरील ताण कमी होऊन वाहतूककोंडीही कमी होईल. 
    - प्रकाश गोगावले, रहिवासी, उलवे 


 

Web Title: Due to the railway service, the development of urine will reduce the speed, traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.