सानपाडा शाळेविषयी महापालिकेचा दुजाभाव
By Admin | Updated: September 12, 2015 23:26 IST2015-09-12T23:26:26+5:302015-09-12T23:26:26+5:30
सानपाडामध्ये महापालिकेने सन २०१० मध्ये नवीन ईमारत बांधली. परंतु पाच वर्ष झाल्यानंतरही त्याचे उद्घाटन करण्यात आले नाही. शाळेच्या वाढीव मजल्यासाठीची निविदा

सानपाडा शाळेविषयी महापालिकेचा दुजाभाव
नवी मुंबई : सानपाडामध्ये महापालिकेने सन २०१० मध्ये नवीन ईमारत बांधली. परंतु पाच वर्ष झाल्यानंतरही त्याचे उद्घाटन करण्यात आले नाही. शाळेच्या वाढीव मजल्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही प्रस्ताव स्थायी समितीसमोर आणला जात नाही. पालिका जाणीवपूर्वक दुजाभाव करीत असल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे.
महापालिकेची स्थापना झाल्यानंतर शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळाही पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्या. या शाळांच्या इमारती मोडकळीस आल्यामुळे प्रशासनाने स्कूल व्हिजनच्या माध्यमातून नवीन ईमारतींचे बांधकाम केले आहे. यामध्ये सानपाडामधील शाळा क्रमांक १८ व १९ चाही समावेश आहे. श्री दत्तविद्यामंदिर नावाने ओळखल्या जाणाऱ्या शाळेच्या इमारतीचे बांधकाम २०१० मध्ये पुर्ण झाले. या इमारतीमध्ये सद्यस्थितीमध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग भरत आहेत. प्राथमीकमध्ये ८०० तर माध्यमीकमध्ये १३६ विद्यार्थी शिकत आहेत.
विद्यार्थी संख्या वाढत असल्यामुळे शाळेतील ईमारत कमी पडू लागली आहे. प्रयोग शाळा, ग्रंथालय व इतर गोष्टींसाठी जागा नसल्यामुळे एक मजला वाढविण्यासाठी पालिकेने निवीदा मागविल्या होत्या. दोन वेळा प्रतिसाद न मिळाल्यामुळे तिसऱ्यांदा निवीदा मागविल्या. आता या प्रस्तावास स्थायी समितीची परवानगी आवश्यक आहे. परंतू पाठपुरावा करूनही हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आणला जात नाही. स्थानीक नगरसेवीका कोमल वास्कर यांनी गत आठवड्यातील स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मंजूरीसाठी आणला जात नसल्याविषयी तिव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासन दुजाभाव करत असल्याचा आरोप केला. नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की सानपाडा शाळेविषयी नेहमीच दुजाभाव केला गेला आहे. पाच वर्षात ९ पत्र देवूनही अद्याप शाळेचे उद्घाटन केलेले नाही. उद्घाटन न करताच शाळा सुरू आहे. आता वाढीव मजल्याचे कामही मंजूर केले जात नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हा प्रस्ताव लवकर मंजूर करावा
अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली
आहे.