शहरं
Join us  
Trending Stories
1
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
2
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
3
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
4
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
5
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
6
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
7
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
8
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
9
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
11
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
12
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
13
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
14
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
15
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
16
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
17
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
18
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
19
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
20
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली

रुग्णवाढीमुळे पनवेल महापालिका क्षेत्राची पुन्हा रेड झोनकडे वाटचाल, पालिकेची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 8:36 AM

पनवेल महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे. दररोज कोरोना रुग्ण सापडल्याचा आकडा दीडशेच्या जवळपास पोहोचला आहे. मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णात वाढ झाली आहे.

अरुणकुमार मेहत्रे -

कळंबोली : पनवेल महापालिका परिसरात गर्दी, संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन होत असल्याने  दिवसेंदिवस कोरोना रुग्णात वाढ होत आहे. मार्च महिन्यापासून म्हणजे गेल्या १३ दिवसात १ हजार २२६ जणांना  कोरोना संसर्गाची लागण झाली आहे, तर कामोठे, खारघर, कळंबोली शहर कोरोनाच्या हॉटस्पॉटवर आहेत. त्यामुळे पनवेल महापालिका परिसराची  वाटचाल पुन्हा रेड झोनकडे होत असल्याचे दिसून येत आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे. दररोज कोरोना रुग्ण सापडल्याचा आकडा दीडशेच्या जवळपास पोहोचला आहे. मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णात वाढ झाली आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. बाजारपेठेत आजतागायत गर्दी होत आहे. भाजी मंडई, दुकानातील गर्दी, हॉटेल, बसस्थानक,  लोकल रेल्वे प्रवासासाठी करण्यात येणारी गर्दी, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, या गोष्टी घातक ठरत आहेत. यामुळे पनवेल महापालिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा  वर्षभराचा आढावा पाहिला तर शनिवारपर्यंत ३१ हजार २३७ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे, तर ६५२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्चपासून रुग्ण संख्येत वाढ होत आहे. यात कळंबोली, खारघर, कामोठे, नवीन पनवेल , पनवेल या परिसरात जास्त रुग्ण सापडत आहेत.. वाढत्या संख्येने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पनवेल महापालिकेकडून करण्यात येणारी कारवाई त्याचबरोबर रेल्वे लोकल सेवा तसेच बसस्थानक, बाजार समिती, भाजी मंडई येथील सोशल डिस्टन्सिंग तसेच  मास्कचा अभाव,  हॉटेल, ढाबे यांच्याकडून पाळण्यात न येणारे नियम कोरोना वाढीस कारण ठरत आहेत. याकडे  पालिका प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे बनले आहे. 

रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत  पालिका क्षेत्रात  संचारबंदी लागू असली तरी हॉटेल, रेस्टॉरंन्ट उशिरापर्यंत सुरु असतात. १  मार्च ते १३ मार्च २०२१ पर्यंतचा आढावा शहर     सापडलेले  रुग्ण खारघर           ४२४ कामोठे           २४८ कळंबोली        १८४ नवीन पनवेल    १६२ पनवेल            १३४ खांदा कॉलनी    ५४ तळोजा            १०एकूण             १२२६ आतापर्यंत मृत्यू     ८

गेल्या वर्षभरात पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी अहोरात्र काम करून कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. दुसऱ्या  लाटेत कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्याकरिता पालिका प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासंदर्भात कारवाई करत आहोत. पालिका परिसरातील शाळा बंद केल्या आहेत. दुकानदार, हॉटेल, बाजारपेठ, रहदारीच्या ठिकाणी वेळोवेळी सूचना करण्यात येत आहेत.  नियमांचे पालन करण्यास सांगितले जात आहे. नागरिकाकडून याबाबत  सहकार्याची अपेक्षा आहे. - सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगडNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका