शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल दुरुस्तीच्या आड ड्रग्ज तस्करी; एपीएमसीत कोट्यवधीचे एमडी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 15:15 IST

या कारवाईदरम्यान आरोपीकडून १ कोटी १० हजार रुपयांचे एमडी जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

नवी मुंबई : मोबाइल दुरुस्तीच्या दुकानाआड ड्रग्ज तस्करी करणाऱ्या शामसुद्दीन अब्दुल कादर एटिंगल (२९) याला बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई नवी मुंबईच्या अमली पदार्थविरोधी पथकाने एपीएमसी परिसरात केली. या कारवाईदरम्यान आरोपीकडून १ कोटी १० हजार रुपयांचे एमडी जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

नवी मुंबई शहर नशामुक्त करण्यासाठी पोलिसांनी ड्रग्ज विकणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. या विशेष मोहिमेंतर्गत ड्रग्जविक्री, पुरवठा करणाऱ्यांवर पाळत  ठेवत असताना एपीएमसीमधील सतरा प्लाझा परिसरात एक जण ड्रग्ज विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे, सहायक पोलिस आयुक्त गजानन राठोड अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नीलेश धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक कुलदीप मोरे, हवालदार रमेश तायडे यांनी सतरा प्लाझा परिसरात सापळा लावला. त्यावेळी तेथे आलेल्या एका संशयास्पद व्यक्तीला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एक किलो ११ ग्रॅम एमडी आढळून आले. या एमडीची किंमत एक कोटी एक लाख १० हजार रुपये असल्याचे निष्पन्न झाले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSmugglingतस्करीPoliceपोलिस