हत्येप्रकरणी दरोडेखोरास जन्मठेप
By Admin | Updated: September 19, 2014 02:48 IST2014-09-19T02:48:39+5:302014-09-19T02:48:39+5:30
नंदनसिंग कैरा या कंपनी मालकाच्या हत्येप्रकरणी नागराज गौडा या दरोडेखोरास कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

हत्येप्रकरणी दरोडेखोरास जन्मठेप
कल्याण : नंदनसिंग कैरा या कंपनी मालकाच्या हत्येप्रकरणी नागराज गौडा या दरोडेखोरास कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या खटल्यातील अन्य एक आरोपी मोगळया नाटेकर याची मात्र सबळ पुराव्याअभावी निर्दाेष मुक्तता करण्यात आली.
अलका स्टील वायर कंपनीवर 2 डिसेंबर 2क्क्9 रोजी दरोडा पडल्याची घटना घडली होती. या वेळी कंपनीत मालक नंदनसिंग आणि त्यांचा मुलगा शैलेंद्रसिंग या दोघांसह काही कामगार काम करीत होते. दरोडय़ाच्या उद्देशाने कंपनीत घुसलेल्या चौघा जणांनी प्रथम शैलेंद्रसिंग याला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून शेठला बोलव, असा असा दम भरला. दरोडेखोर आल्याची माहिती मिळताच नंदनसिंग स्वसंरक्षणार्थ चाकू घेऊन आपल्या केबिनबाहेर आले. या वेळी दरोडेखोरांनी त्यांच्या दिशेने रोखलेली रिव्हॉल्व्हर नंदनसिंग यांनी हिसकावण्याचा प्रय} केला असता त्यांच्यावर गोळी झाडली गेली़ यात जखमी झालेल्या नंदनसिंग यांनी नागराज गौडा नामक दरोडेखोरावरही हल्ला केला़ गोळी लागलेल्या नंदनसिंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर या झटापटीत नागराज जखमी झाला. तिघा दरोडेखोरांनी पळ काढण्याचा प्रय} केला, यातील मोगळया नाटेकरलाही पकडण्यात आले. त्याच्यासह जखमी अवस्थेतील नागराजला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले होते.
शैलेंद्रसिंग यांच्या तक्रारीवरून नागराज आणि मोगळया याच्यासह अन्य दोघांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीड महिन्यापूर्वी मोगळयाने कंपनीतील नोकरी सोडल्याचे पोलीस चौकशीत समोर आले. खटला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात चालला.