नवी मुंबई पालिकेला डबल ए प्लस पत मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 00:01 IST2020-10-07T00:01:34+5:302020-10-07T00:01:47+5:30
देशातील आर्थिकदृष्ट्या सक्षम महानगरपालिकांमध्ये नवी मुंबईचाही समावेश आहे.

नवी मुंबई पालिकेला डबल ए प्लस पत मानांकन
नवी मुंबई : महानगरपालिकेला सलग सहाव्या वर्षी डबल ए प्लस पत मानांकन प्राप्त झाले आहे. सातत्यपूर्ण बहुमान मिळविणारी नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका असून, काटेकोर आर्थिक नियोजनामुळे कामगिरीत सातत्य ठेवणे शक्य झाले आहे.
देशातील आर्थिकदृष्ट्या सक्षम महानगरपालिकांमध्ये नवी मुंबईचाही समावेश आहे. मनपाकडे एमएमआरडीए, एमआयडीसी किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून घेतलेले कर्ज थकलेले नाही. कर्मचारी व ठेकेदारांची बिले वेळेत दिली जात आहेत. होस्ट टू होस्ट प्रणालीद्वारे देयके दिली जात आहेत.
करवसुलीही उत्तम प्रकारे सुरू आहे. या सर्व कामगिरीची दखल घेऊन इंडिया रेटिंग अँड रिसर्च या संस्थेच्या वतीने मनपाला २०१९ - २० या आर्थिक वर्षासाठी डबल ए प्लस मानांकन देण्यात आले आहे.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड व त्यांच्या विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आर्थिक नियोजनाकडे बारकाईने लक्ष दिले आहे.
पतमानांकन मिळाल्याने आनंद झाला आहे. देशातील निवासयोग्य शहरांमध्ये देशातील दुसºया क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा पुरविताना जमा व खर्चाच्या बाबींकडे काटेकोरपणे लक्ष दिले जात आहे. यामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त झालेआहे.
-अभिजीत बांगर, आयुक्त,
नवी मुंबई महानगरपालिका