ढोकाळीचे मिनी स्टेडीअम 1क् महिन्यानंतरही बंदच
By Admin | Updated: November 8, 2014 22:52 IST2014-11-08T22:52:38+5:302014-11-08T22:52:38+5:30
क्रीडा रसिकांसाठी अथवा क्रीडापटूंसाठी खुले झालेले नसल्याची बाब समोर आली आहे. संबंधित ठेकेदाराने केवळ वापर परवाना सादर न केल्यानेच ते खुले केले नसल्याचा दावा पालिकेने केला आहे.

ढोकाळीचे मिनी स्टेडीअम 1क् महिन्यानंतरही बंदच
ठाणो : लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अपूर्ण अवस्थेत असलेल्या ढोकाळी येथील मिनी स्टेडिअमचे लोकार्पण होऊन 10 महिन्यांचा कालावधी लोटला तरीसुद्धा ते आजही क्रीडा रसिकांसाठी अथवा क्रीडापटूंसाठी खुले झालेले नसल्याची बाब समोर आली आहे. संबंधित ठेकेदाराने केवळ वापर परवाना सादर न केल्यानेच ते खुले केले नसल्याचा दावा पालिकेने केला आहे.
लोकसभा निवडणूक लागण्याआधी 8 फेब्रुुवारी 2क्14 रोजी या मिनी स्टेडिअमचे लोकार्पण तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले होते. परंतु, लोकार्पणापूर्वीच विविध कारणांवरून वादग्रस्त ठरलेल्या या स्टेडिअमचे लोकार्पण झाल्यानंतरही प्रत्यक्षात यामधील अनेक कामे अपूर्णावस्थेत होती. ठाणो महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय तरतूद आणि खासदार निधी असा एकूण सुमारे 24 कोटी 37 लाखांचा खर्च यासाठी करण्यात आला होता. या स्टेडिअममध्ये बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट, रायफल शूटिंग, लॉन टेनिस, बास्केट बॉल, कॅरम-चेस सेंटर, फिटनेस सेंटर सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार, यामध्ये विविध खेळांसाठी हॉल व कोर्टची सोय करणो आवश्यक होते. मात्र, त्या ठिकाणी खेळासंबंधी अद्ययावत कोणत्याही वस्तू मात्र उपलब्ध केलेल्या नसल्याची बाब लोकमतने उघडकीस आणली होती. परंतु, केवळ या कामाचे श्रेय महापालिकेतील सत्ताधारी मंडळींनी घेऊ नये म्हणून या स्टेडिअमचे लोकार्पण उरकण्यात आले होते. शिल्लक राहिलेले काम एप्रिलमध्ये पूर्ण करून ते क्रीडाप्रेमी आणि क्रीडा रसिकांसाठी खुले केले जाईल, असे संबंधित ठेकेदाराने स्पष्ट केले होते.
परंतु, आता स्टेडिअमचे काम पूर्ण झाले असून अद्यापही ते खुले केले नसल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात काही क्रीडाप्रेमी आणि क्रीडा रसिकांनी माजी खासदार संजीव नाईक यांच्याकडे लेखी तक्रारीदेखील केल्या आहेत. त्यानंतर, त्यांची महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनासुद्धा हे स्टेडिअम खुले करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. केवळ संबंधित ठेकेदाराने वापर परवाना सादर न केल्याने हे स्टेडिअम खुले केले नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. परंतु, आता येत्या काही दिवसांत हा परवाना सादर केला जाणार असून ते खुले होणार असल्याचे पालिका सूत्रंनी स्पष्ट केले.
4ठाणो महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय तरतूद आणि खासदार निधी असा एकूण सुमारे 24 कोटी 37 लाखांचा खर्च यासाठी करण्यात आला होता.
48 फेब्रुुवारी 2क्14 रोजी या मिनी स्टेडिअमचे लोकार्पण तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले होते.
4या स्टेडिअममध्ये बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट, रायफल शूटिंग, लॉन टेनिस, बास्केट बॉल, कॅरम-चेस सेंटर, फिटनेस सेंटर सुरू करण्यात येत आहेत.