डोंबिवलीत घरफोड्या, विनयभंग वाढले

By Admin | Updated: December 8, 2015 00:28 IST2015-12-08T00:28:59+5:302015-12-08T00:28:59+5:30

पुणेनंतर राज्याची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळख जपणाऱ्या डोंबिवली शहरातील एका इमारतीत चड्डी-बनियान टोळीने घरफोडी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे

Dombivli burglary, molestation increased | डोंबिवलीत घरफोड्या, विनयभंग वाढले

डोंबिवलीत घरफोड्या, विनयभंग वाढले

आकाश गायकवाड,  डोंबिवली
पुणेनंतर राज्याची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळख जपणाऱ्या डोंबिवली शहरातील एका इमारतीत चड्डी-बनियान टोळीने घरफोडी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. डोंबिवली पश्चिमेतील रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून, शहराला घरफोड्या, चेन स्नॅचिंग, वाहनचोरी, मारामाऱ्या, विनयभंग, खंडणी आदी प्रकारानेही धास्ती भरली आहे.
डोंबिवलीतील गुन्हेगारी गेल्या काही दिवसात वाढ झाल्याचे दिसत आहे. डान्स बार पुन्हा सुरू झाल्याने शहरातले वातावरण दिवसेंदिवस असुरिक्षत होण्याचे भय डोंबिवलीकर व्यक्त करीत आहेत.
डोंबिवली शहरातील एकूण गुन्हेगारीतच वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली असून, महिलांवरील अत्याचारांचे गुन्हेसुद्धा वाढू लागले. शाळा-कॉलेजेसच्या बाहेर मुलींची छेड काढणे किंवा त्यांचा पाठलाग करण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. मात्र बदनामीच्या भीतीपोटी कॉलेजच्या तरु णी तक्र ारी करण्यास पुढे येत नाहीत. यासाठी पोलिसांनी शाळा-कॉलेजजवळ गस्त वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे. शहरातील महिला पोलीस बल कॉलेज आणि शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या परिसरात साध्या वेशातील पोलीस तैनात केल्यास रोडरोमीओंवर जरब बसवता येईल, असे जागरुक नागरिकांचे म्हणणे आहे.
अनिधकृत बांधकामांचा आसरा
डोंबिवली पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण भागांमध्ये अनधिकृत इमारती, चाळी मोठ्या प्रमाणात बांधल्या जात आहे . तसेच ही घरे अवघ्या दोन ते
तीन हजारांमध्ये भाड्याने मिळतात. घरे भाड्याने घेणाऱ्या
व्यक्तींची तपासणी केली जात नाही. त्यामुळे ही घरे गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना आसरा ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे .

Web Title: Dombivli burglary, molestation increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.