‘सभा कशी चालवायची आम्हाला शिकवू नका’

By Admin | Updated: October 15, 2016 06:54 IST2016-10-15T06:54:59+5:302016-10-15T06:54:59+5:30

सभा कशी चालवायची ते आम्हाला शिकवू नका. माईक बंद करायचा की चालू ठेवायचा, आम्हाला सल्ले देवू नका. विषय पत्रिकेव्यतिरिक्त शहरवासीयांच्या समस्या

'Do not teach us how to run meetings' | ‘सभा कशी चालवायची आम्हाला शिकवू नका’

‘सभा कशी चालवायची आम्हाला शिकवू नका’

नवी मुंबई : सभा कशी चालवायची ते आम्हाला शिकवू नका. माईक बंद करायचा की चालू ठेवायचा, आम्हाला सल्ले देवू नका. विषय पत्रिकेव्यतिरिक्त शहरवासीयांच्या समस्या सभागृहात मांडता येत नाहीत हा शोध तुम्ही कोठून लावला आहे? जनतेचे प्रश्न मांडता येणार नसतील तर आम्ही काय खुर्चीत बसण्यासाठी आलो आहोत का, अशा शब्दात स्थायी समिती सभापती शिवराम पाटील यांनी उपआयुक्त सुहास शिंदे यांना खडसावले.
स्थायी समिती बैठकीसाठी आयुक्त तुकाराम मुंढे व अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण नसल्यामुळे त्यांच्यावतीने उपआयुक्त सुहास शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली होती. सभापती शिवराम पाटील यांनी घणसोली हस्तांतरणाचे काय झाले? नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत असून प्रशासनाने याबाबत निवेदन करण्याच्या सूचना केल्या.
शिंदे यांनी प्रथम विषय पत्रिकेवरील प्रस्तावांवर चर्चा करावी, त्या व्यतिरिक्त चर्चा करता येत नसल्याचे सांगितले. यामुळे संतापलेल्या सभापतींनी प्रशासनास धारेवर धरले.
‘आम्ही १५ वर्षे सभागृहात व स्थायी समितीमध्येही आहोत. कोणत्या विषयावर चर्चा करायची ते मी ठरवेन. तुमच्या सल्ल्याने सभा चालविण्याची गरज वाटत नसल्याचे स्पष्ट केले. सभापतींचा पारा चढल्यामुळे शिंदे यांनी तुम्ही माईक बंद करून बोला असे सुचविले.
वारंवार तुम्ही माईक बंद करा असे सांगितले जात असल्यामुळे मी काय करायचे याविषयी तुम्ही सल्ला देण्याची गरज नसल्याचे सांगितले.
प्रशासनाच्यावतीने शिंदे यांनी घणसोली हस्तांतरणाविषयी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंत्रालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचे सांगितले. मात्र प्रशासनाच्या भूमिकेविषयी इतर सदस्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: 'Do not teach us how to run meetings'