शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

दहावीच्या विद्यार्थ्यांना जुन्या स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 00:42 IST

प्रत्येक वर्षी नवीन पुस्तिका देण्याची मागणी

- योगेश पिंगळेनवी मुंबई : इयत्ता दहावीला खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या नवी मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून जुन्या स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले आहे. नवीन स्वाध्याय पुस्तिकांमध्ये प्रश्नपत्रिका आणि मूल्यमापन आराखडा बदलण्यात आला असताना, जुन्या स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप झाल्याने मार्च २०२० साली दहावीच्या परीक्षेला सामोरे जाणाºया खासगीरीत्या प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रत्येक वर्षी नव्याने बदल केलेल्याच स्वाध्याय पुस्तिका विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात, अशी मागणी केली जात आहे.

दहावीच्या वर्गात शिकणाºया व नियमित शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांना गृहपाठ, तोंडी परीक्षा आदी अभ्यासक्र म शाळांमधून करवून घेतला जातो. यासाठी २० गुण राखीव असतात आणि वार्षिक परीक्षा ८० मार्कांची घेण्यात येते. दहावीच्या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होणाºया विद्यार्थ्यांना या गुणांचा लाभ घेता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सर्व विषयांच्या स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात येते. यासाठी फॉर्म भरते वेळी ११०० रु पये नोंदणी शुल्कही घेण्यात येते.

या वर्षी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, इतिहास, भूगोल आणि गणित विषयांच्या स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले आहे. मराठी आणि हिंदी विषयाच्या स्वाध्याय पुस्तिकांचे अद्याप वाटप करण्यात आले नाही. वाटप करण्यात आलेल्या स्वाध्याय पुस्तिकांमध्ये इंग्रजी विषय वगळता इतर तिन्ही विषयांच्या स्वाध्याय पुस्तिका या सन २०१८-१९ वर्षातील म्हणजेच जुन्या आहेत.

जुन्या स्वाध्याय पुस्तिकेतील प्रश्नपत्रिका आराखडा आणि मूल्यमापन आराखडा यामध्ये मंडळाने बदल केले आहेत; परंतु नवी मुंबईतील विद्यार्थ्यांना जुन्या स्वाध्याय पुस्तिका वितरित करण्यात आल्या असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रत्येक वर्षी संभाव्य प्रश्नांच्या आराखड्यानुरूप नव्याने बदल करण्यात आलेल्या स्वाध्याय पुस्तिका विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातील घटकांकडून केली जात आहे.

नवीन स्वाध्याय पुस्तिकेतील प्रश्नपत्रिका आराखडा आणि मूल्यमापन आराखडा यामध्ये बदल करण्यात आला आहे. हा बदल जुन्या स्वाध्याय पुस्तिकेतही करण्यात आला आहे.- शरद खंडागळे, सचिव, मुंबई विभागीय शिक्षण मंडळ

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईStudentविद्यार्थीEducationशिक्षणSchoolशाळा