शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
3
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
4
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
5
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
8
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
9
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
10
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
11
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
12
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
13
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
14
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
15
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
16
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
17
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
18
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
19
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
20
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा

पनवेलमध्ये वैद्यकीय कचऱ्याची घंटागाडीतून होते विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:28 PM

खांदा वसाहतीत बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर टाकण्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी पनवेल शहरातील गांधी हॉस्पिटलसमोरील कचराकुंडीत मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा आढळून आला आहे.

कळंबोली : खांदा वसाहतीत बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर टाकण्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी पनवेल शहरातील गांधी हॉस्पिटलसमोरील कचराकुंडीत मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा आढळून आला आहे. कचराकुंडीतील या बायोमेडिकल कचºयाची घंटागाडीतून विल्हेवाट लावली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रहिवाशांनी जोरदार आक्षेप घेतला असून, संबंधित रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी दवाखाने आहेत. यातील अनेक रुग्णालयांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, नियमानुसार रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्ट मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला देणे बंधनकारक आहे, त्यासाठी शुल्क भरावे लागते. हे शुल्क वाचविण्यासाठी अनेक रुग्णालये निर्माण होणाºया वैद्यकीय कचºयाची सार्वजनिक कुंडीत विल्हेवाट लावत असल्याचे दिसून आले आहे.महापालिकेची घंटागाडी दैनंदिन कचरा गोळा करण्यासाठी बुधवारी येथील गांधी हॉस्पिटलजवळ गेली असता बाहेरील कचराकुंडीत रिकाम्या सलाइन्सच्या बाटल्या, टॅबलेटचे पॉकिट, इंजेक्शनच्या सुई आदीचा साठा आढळून आला. या कचराकुंडीत अशाप्रकारचा कचरा नेहमीच असतो. त्यामुळे तो उचलताना हातापायाला इजा होते, असे घंटागाडी कामगारांनी सांगितले. वैद्यकीय कचºयाची अशाप्रकारे विल्हेवाट लावणाºया रुग्णालयावर महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.दरम्यान, या संदर्भात महापालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. तर संबंधित रुग्णालयाचे डॉ. प्रमोद गांधी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते व्यस्त असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.बायोमेडिकल वेस्ट वेगळे ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे; परंतु घंटागाडीत हा घातक कचरा टाकला जात असल्याने सफाई कामगारांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हा प्रकार तातडीने थांबविला गेला नाही, तर नाईलाजास्तव काम बंद आंदोलन करावे लागेल.- प्रथमेश चंद्रशेखर सोमण,सल्लागार संस्थापक,शिवप्रेरणा श्रमिक कामगार सेना

टॅग्स :Medicalवैद्यकीयGarbage Disposal Issueकचरा प्रश्नpanvelपनवेलhospitalहॉस्पिटल