खाडीत बुडालेल्या अभिषेकचा शोध सुरूच

By Admin | Updated: October 16, 2016 03:37 IST2016-10-16T03:37:10+5:302016-10-16T03:37:10+5:30

कोपरा खाडीपुलावरून निर्माल्य पाण्यात फेकताना तरु णाचा तोल जाऊन खाडीत पडल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी १४ आॅक्टोबरला रात्री ९च्या सुमारास कोपरा येथे घडली.

The discovery of Abhishek lying on the bay continued | खाडीत बुडालेल्या अभिषेकचा शोध सुरूच

खाडीत बुडालेल्या अभिषेकचा शोध सुरूच

पनवेल : कोपरा खाडीपुलावरून निर्माल्य पाण्यात फेकताना तरु णाचा तोल जाऊन खाडीत पडल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी १४ आॅक्टोबरला रात्री ९च्या सुमारास कोपरा येथे घडली. अभिषेक कासरेकर (१८) असे या तरुणाचे नाव असून, दुसऱ्या दिवशीही या तरुणाचा मृतदेह शोधपथकाच्या हाती लागला नाही.
आपल्या वडिलांसोबत घरातील निर्माल्य पाण्यात फेकण्यासाठी आलेल्या आभिषेकवर काळाने घाला घातला. यामुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एका गोणीत भरलेले निर्माल्य कोपरा खाडीपुलावरून फेकत असताना अचानक अभिषेकचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. या वेळी त्याचे वडील अनंत कासरेकर हेदेखील त्याच्या जवळच उभे होती, मात्र त्यांना पोहता येत नसल्यामुळे ते हतबल झाले होते. काही वेळातच अग्निशमन पथक सायन- पनवेल टोलजवळ आले. कामोठे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अभिषेकला शोधण्याचा प्रयत्न सुरू केला, मात्र भरती असल्याने रात्री या शोधपथकाच्या हाती काहीच लागले नाही. दुसऱ्या दिवशी शनिवारीदेखील उशिरापर्यंत शोधपथकाच्या हाती काही लागले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: The discovery of Abhishek lying on the bay continued