आपत्ती नियंत्रण कक्ष १ जूनपासून

By Admin | Updated: May 24, 2016 02:01 IST2016-05-24T02:01:39+5:302016-05-24T02:01:39+5:30

सिडको कार्यक्षेत्रामध्ये पावसाळ्यामध्ये कोणतीही आपत्ती ओढवू नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. १ जूनपासून आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू केला जाणार असून चोवीस तास

The Disaster Control Room from June 1 | आपत्ती नियंत्रण कक्ष १ जूनपासून

आपत्ती नियंत्रण कक्ष १ जूनपासून

नवी मुंबई : सिडको कार्यक्षेत्रामध्ये पावसाळ्यामध्ये कोणतीही आपत्ती ओढवू नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. १ जूनपासून आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू केला जाणार असून चोवीस तास मदतकार्य सुरू ठेवले जाणार आहे.
सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनच्या तळमजल्यावर उघडण्यात आलेला हा नियंत्रण कक्ष १ जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंत चोवीस तास सुरू राहणार आहे. नागरिकांना संपर्क साधण्यासाठी फोननंबर व व्हॉट्सअ‍ॅप नंबरही उपलब्ध करून दिला जाणार आहे. वृक्षांची पडझड, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी, रस्त्यावरील उघड्या गटारांची झाकणे सुरक्षित करणे, रस्त्यांची दुरवस्था, रोड व नाल्याजवळील साचलेला कचरा, आग, साथीचे आजार व भूस्खलनाविषयी तक्रारींचे निवारण या कक्षाद्वारे केले जाणार आहे. दगडखाणी आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जागांवर धोक्याच्या सूचना देणारे फलक लावण्यात येणार आहेत.

Web Title: The Disaster Control Room from June 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.