महासंचालकांकडून नेरूळ पोलिसांचा गौरव; सर्वोत्कृष्ट तपास

By Admin | Updated: November 4, 2015 23:34 IST2015-11-04T23:34:51+5:302015-11-04T23:34:51+5:30

घरफोडीच्या गुन्ह्याचा सर्वोत्कृष्ट तपास करून गुन्हेगाराला अटक केल्याप्रकरणी पोलीस महासंचालकांकडून नेरूळ पोलिसांना गौरवण्यात आले आहे. नेरूळ पोलीस ठाणे हद्दीत

Director General of Nerul Police; Best Investigation | महासंचालकांकडून नेरूळ पोलिसांचा गौरव; सर्वोत्कृष्ट तपास

महासंचालकांकडून नेरूळ पोलिसांचा गौरव; सर्वोत्कृष्ट तपास

नवी मुंबई : घरफोडीच्या गुन्ह्याचा सर्वोत्कृष्ट तपास करून गुन्हेगाराला अटक केल्याप्रकरणी पोलीस महासंचालकांकडून नेरूळ पोलिसांना गौरवण्यात आले आहे. नेरूळ पोलीस ठाणे हद्दीत नोव्हेंबर २०१४ मध्ये हा गुन्हा घडला होता. त्यामध्ये हरवलेल्या चावीवरून पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला होता.
पामबीच रोडवरील सी ब्रिज टॉवरमध्ये हा गुन्हा घडला होता. तिथे राहणाऱ्या दीपा चौहाण यांच्या घरी घरफोडी झाली असता त्यामध्ये ६६ लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नेरूळ पोलिसांनी तपासाअंती त्यांचा जुना कार चालक सोहेब सुतार (२७) याला अटक केली होती. त्याने नोकरीवर असताना घरातील चाव्यांचा गुच्छा चोरला होता. यानंतर त्या घराबाहेर गेल्याचे समजताच सुरक्षा रक्षकाला हाताशी धरून तिथे घरफोडी केली होती. चौहाण यांच्या घरात सीसीटीव्ही बसवलेले होते. याची सुतारला माहिती असल्याने त्याने घटनेच्या काही दिवस अगोदर कॅमेराची वायर तोडली होती. ही बाब माहीत झाल्यानंतरही चौहाण यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. यामुळे त्या घराबाहेर गेल्याची संधी साधून त्याने सुरक्षा रक्षकाला विश्वासात घेवून त्याठिकाणी घरफोडी केली. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे, परिमंडळ उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संगीता अल्फांसो यांचे पथक तपास करत होते. तपासादरम्यान चौहाण यांच्या चौकशीत त्यांच्या घराच्या व कपाटाच्या चावीचा गुच्छा काही दिवसांपासून हरवलेला असल्याचे समजले. यावरून कामावरून काढलेला त्यांचा कारचालक सोहेब सुतारला ताब्यात घेतले असता घटनेचा उलगडा झाला. पोलीस आयुक्त प्रभात रंजन, अप्पर आयुक्त विजय चव्हाण यांनीही नेरूळ पोलिसांचे कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Director General of Nerul Police; Best Investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.