फलाट आणि डब्यातील अंतर ठरते आहे जीवघेणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2016 01:20 IST2016-06-06T01:20:57+5:302016-06-06T01:20:57+5:30
पश्चिम रेल्वेच्या स्थानकामध्ये येणाऱ्या सफाळे, डहाणू, वैतरणा, पालघर इ. स्थानकादरम्यान चालू झालेल्या लोकल सेवेत अनेक नवीन लोकल गाडयांच्या फेऱ्यांची भर पडत

फलाट आणि डब्यातील अंतर ठरते आहे जीवघेणे
डहाणू/सफाळे : पश्चिम रेल्वेच्या स्थानकामध्ये येणाऱ्या सफाळे, डहाणू, वैतरणा, पालघर इ. स्थानकादरम्यान चालू झालेल्या लोकल सेवेत अनेक नवीन लोकल गाडयांच्या फेऱ्यांची भर पडत असली तरी या स्थानकांचे फलाट व लोकलचे डबे यातील मोठे अंतर प्रवाशांसाठी जीवघेणे ठरते आहे. काही प्रवासी त्यामुळे पडून जायबंदीही झाले आहेत.
विरार-डहाणू दरम्यान सुरू असलेल्या लोकल सेवेला अनेक नवीन लोकल्सची भर पडत आहे. मात्र वापरात येत असलेल्या फलाटाची उंची ही खूप जास्त आहे. या फलाटाची उंची ही शटल व एक्सप्रेस गाडयांच्या सोयी नुसार केलेली आहे. या शटल व एक्सप्रेस डब्यांना पायऱ्यांची सोय असल्याने ही उंची होती मात्र आता आता चालू झालेल्या लोकलंच्या डब्यांमधील व फलाटामधील अंतर खूप जास्त आहे कारण या नवीन लोकल गाडयांच्या डब्यांना उतरण्यासाठी पायऱ्यांची सोय नसल्यामुळे प्रवाशांना, नोकरदारवर्गाला, विद्यार्थ्यांना मोठया त्रासाला सामोरे जावे लागते.
या जास्त अंतरामुळे वयोवृध्द लोकांना लोकलमध्ये चढणे-उतरणे मोठे जिकरीचे होत आहे. या अधिकच्या अंतरामुळे अनेकदा प्रवासी गाडीतून पडतात. काही जखमी
होतात तर काही मरण पावतात अनेकदा गरोदर महिला या लोकल मधून प्रवास करत असतात. त्यांना यामुळे चढणे- उतरणे अगदी
अशक्यच होते. या संपूर्ण परिस्थिती संदर्भात वेळोवेळी निवेदन
देऊनसुध्दा रेल्वे प्रशासन याकडे
दुर्लक्ष करीत आहे. यामुळे
प्रवाशांमध्ये संतापाचे व चिंतेचे वातावरण आहे. (वार्ताहर)