शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

अक्षय्य तृतीया मुहूर्तासाठी विकासक सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 01:45 IST

गुढीपाडव्याच्या मुहूर्तानेही विकासकांना गुंगारा दिला. ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने रियल इस्टेटमध्ये चिंतेचे वातावरण आहे,

नवी मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तानेही विकासकांना गुंगारा दिला. ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने रियल इस्टेटमध्ये चिंतेचे वातावरण आहे, त्यामुळे आता शहरातील लहान-मोठे विकासक अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधण्यासाठी सरसावले आहेत. त्या दृष्टीने विविध स्तरावर जाहिरातबाजी केली जात आहे. सवलतीच्या घोषणा केल्या जात आहेत.

नवी मुंबईत दिवसेंदिवस घरांची मागणी वाढत आहे; परंतु शहरातील जमिनीचे भाव गगनाला भिडल्याने स्वस्त व परवडणारी घरे बांधणे विकासकांना अवघड होऊन बसले आहे. मागणी व पुरवठा यात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे दीड-दोन वर्षांपासून घरांची मागणी कमालीची मंदावली आहे. मालमत्ता विकल्या न गेल्याने, बिल्डर्स आणि गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. त्यामुळे रियल इस्टेट मार्केटवर चिंतेची काजळी पसरली आहे. अशा परिस्थितीत गुढीपाडव्याचा मुहूर्त काही प्रमाणात का होईना तारून नेईल, असा विश्वास विकासकांना वाटत होता; परंतु ग्राहकांनी या वेळीही घरखरेदीकडे पाठ फिरविली. त्यामुळे विकासक चांगलेच धास्तावले आहेत. त्यामुळे किमान अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तरी ग्राहकांअभावी धूळखात पडून असलेल्या मालमत्ता विकल्या जातील, असे विकासकांना वाटत आहे.

त्यानुसार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. काहींनी तर घरखरेदीवर चक्क डिस्काउंट देऊ केले आहे. तर अनेकांनी आपल्या घर नोंदणीवर आकर्षक सवलत जाहीर केली आहे. एकूणच घरखरेदीच्या प्रतीक्षेत असलेला ग्राहक अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तरी बाहेर पडेल, असे विकासकांना वाटते आहे.

विविध घटकांचा रिअल इस्टेटवर परिणामनोटाबंदी, रेरा आणि जीएसटीमुळे नवीन घरांच्या निर्मितीला काही प्रमाणात खीळ बसली आहे. बड्या गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्याने विकासकांचे धाबे दणाणले आहेत, तसेच सर्वसामान्य ग्राहकांनीही घरखरेदीकडे पाठ फिरविल्याने रियल इस्टेट उद्योगावर मंदीचे सावट निर्माण झाले आहे, त्यामुळे गृहखरेदीला शुभ मानले जाणारे दिवाळी, दसरा, गुढीपाडवा व अक्षय्य तृतीया असे विविध मुहूर्त साधण्याचा प्रयास विकासकांकडून होताना दिसत आहे.

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणRera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017GSTजीएसटी