शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

जागतिक तणावातही निर्यातीत दबदबा कायम; ७७६.६८ अब्ज डॉलर्सच्या वस्तू, सेवा परदेशात पाठवल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 05:24 IST

या वर्षात चीन, रशिया, इराक, संयुक्त अरब आमिरात आणि सिंगापूर आदी देशांमध्ये होणारी निर्यात वाढली आहे.

लोकमत न्यूज नेववर्क, नवी दिल्ली : केंद्रीय व्यापार मंत्रालयाने या आठवड्याच्या सुरुवातीला जारी केलेल्या आकडेवारीनुसार नुकत्याच संपलेल्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारतातून तब्बल ७७६.६८ अब्ज डॉलर्स इतक्या मूल्याच्या वस्तू तसेच सेवांची निर्यात करण्यात आल्याचे म्हटले आहे. वार्षिक आधारावर विचार केला असता हे प्रमाण मागील वर्षाइतकेच आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अडचणी आणि वाढलेला भूराजकीय तणाव यामुळे निर्यातीला फारसा फटका बसलेला नाही. 

या वर्षात चीन, रशिया, इराक, संयुक्त अरब आमिरात आणि सिंगापूर आदी देशांमध्ये होणारी निर्यात वाढली आहे. इग्लंड, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या देशांना भारतातून मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.

२०२३-२४ या वर्षातील निर्यातश्रेणी    किंमत    वाढ/घटवस्तू    ४३७.०६ अब्ज डॉलर्स     -३.१%सेवा    ३३९.६२ अब्ज डॉलर्स     ४.४%एकूण    ७७६.६८ अब्ज डॉलर्स     ————

मार्च २०२४ मधील निर्यातवस्तू     ४१.६८ अब्ज डॉलर्स     -०.७%सेवा    २८.५४ अब्ज डॉलर्स     -६.३%

२०२२-२३ या आर्थिक वर्षात वस्तू आणि सेवांची एकूण निर्यात ७७५.८७ अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचली होती. २०२३-२४ या आर्थिक वर्षात आयात ४.८ टक्के इतकी घटून ८५४.८० अब्ज डॉलर्सवर आली आहे.

सरकारच्या प्रयत्नांना यश- केंद्र सरकाकडून देशाची निर्यात वाढवित असतानाच आयातीत घट झाली पाहिजे या दृष्टीने विविध उपाययोजना राबवल्या. इलेक्ट्रानिक्स वस्तूंसह इतर अनेक क्षेत्रांसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजना राबविण्यावर भर दिला.- या उपाययोजनांमुळे भारतातील उत्पादकांमध्ये विश्वास वाढला. जागतिक स्तरावरील उद्योगांशी स्पर्धा करण्यासाठी ते सक्षम बनले. या उपाययोजनांमुळे जागतिक पुरवठासाखळी भारताचे स्थान मजबूत होण्यास मदत झाली आहे.

टॅग्स :IndiaभारतMarketबाजार