शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देणार का? अजित पवार म्हणाले, "उद्घाटन केलं की पुढच्या गोष्टी.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 13:39 IST

नवी मुंबई विमानतळाच्या नावावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचे विधान केले.

Ajit Pawar on Navi Mumbai Airport:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. यावेळी या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येईल अशी अपेक्षा भूमिपुत्रांना होती. मात्र  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा न केल्याने पुन्हा एकदा भूमिपुत्रांमध्ये प्रचंड नाराजीचा सुरु उमटला आहे. विरोधकांनीही दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा न झाल्याने सरकारवर सडकून टीका केली. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरुन महत्त्वाचे विधान केले आहे.

नवी मुंबई विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आले. मात्र नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार दि बा. पाटलांचे नाव देण्याबाबत कोणताही उल्लेख न केल्याने भूमिपुत्रांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता भूमिपूत्र आणि सरकार यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबई विमातळाला दि .बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई व पालघर इथल्या  स्थानिक भूमिपुत्रांकडून वारंवार केली जात आहे. सरकारने त्याबाबत सकारात्मकता देखील दाखवली होती. मात्र उद्घाटनच्या कार्यक्रमात याची घोषणा न झाल्याने भूमिपुत्रांचा अपेक्षा भंग झाला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव देण्यात येणार की ते बदलण्यात येणार असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. यावर बोलताना अजित पवार यांनी जनतेच्या बहुमताचा विचार करुनच निर्णय घेतला जाईल असं म्हटलं.

"एकदा ते विमानतळ व्यवस्थितपणे चालू होऊ द्या. पंतप्रधान मोदींनीही विमानतळाची पाहणी केली. साधारण विमानसेवा सुरु होण्यासाठी साधारण ४५ दिवस लागणार आहेत. एकदा मान्यवरांनी तारीख दिली आणि उद्घाटन केलं की पुढच्या गोष्टी गतीने व्हायला मदत होते. मुंबईच्या विमानतळावर खूप मोठा ताण आहे. त्यामुळे या विमानतळाची गरज होती. आम्ही वाढवण येथेही विमानतळ तयार करण्यासंदर्भात सूतोवच केले आहे. कारण तिथेही आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार करावे लागणार आहे.  आता उद्घाटन केलेल्या विमानतळाची क्षमता नऊ कोटी आहे. राहिलेली कामे चांगल्या पद्धतीने करण्याची आमची भूमिका आहे. त्यासंदर्भात तिथल्या लोकांच्या ज्या काही भावना आहेत त्या लक्षात घेऊन  सरकारकडून योग्य ती कारवाई करु.  नाव देण्याच्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथल्या वेगवेगळ्या शिष्टमंडळांशी चर्चा केलेली आहे. अशा जेव्हा मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी येते त्यावेळी जनतेच्या बहुमताचा विचार करुनच निर्णय घेतला जातो," असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Navi Mumbai Airport Name: Ajit Pawar on Naming After D.B. Patil

Web Summary : Ajit Pawar addressed the naming of Navi Mumbai Airport after D.B. Patil, stating a decision considering public opinion will be made after operations commence. He emphasized the airport's importance in relieving Mumbai's air traffic congestion.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबई